ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
पावसाळा आता येईलच पण त्याआधीच आपण घरात पाऊस पाडूया का?साहित्य: 1 ताटली, 1 काचेचा जर, 1ते 2 कप आईस क्यूब्ज, आणि गरम पाणी कृती:1) गरम पाणी काचेच्या जारमध्ये घ्या. जवळपास पाऊण जार भरायला हवा. 2) त्यावर ताटली ठेवा. 3) आता आईस क्यूब्ज त्या त्या ताटलीवर काळजीपूर्वक ठेवा. 4) आणि जारच्या आतमध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली बघा.
आहे की नाही सोप्प पाऊस पाडणं. जे निसर्गात घडतं तेच आपण किचनमध्येही तयार करू शकतोच. याचा व्हिडीओ काढून तुमची तुमच्या मित्रमैत्रीणींशीही शेअर करू शकता.