तर आज काय करायचं? प्लीज घरातलं कुठलंही काम सांगू नका. ‘नुसताच बसला / बसली आहेस!’ म्हणून घरच्यांनी पार बटाट्याचा कीससुद्धा यावर्षी घालायला लावलाय. त्यामुळे काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग असेल तर सांगा.. असं झालंय ना तुमचं पण? घरोघरच्या लहान मुलांची हीच अवस्था झाली आहे. सारखी मोठी माणसं आपल्याला कामं सांगतात असं वाटतंय का तुम्हाला? तर आज आपण त्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. घ्या बरं एक मोठ्ठा कागद आणि पेन. आणि करा यादी.आपल्या घरात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपयर्ंत कुठली कुठली कामं होतात ती लिहूनच काढा एका कागदावर. लिहायचा कंटाळा येत असेल तर चित्र काढा. म्हणजे स्वयंपाकासाठी कूकर किंवा गॅस, नाश्त्यासाठी कढई, चहासाठी कप, कपडे धुण्यासाठी बादली, वाळत घातलेले कपडे, इस्त्री, गाद्या घालण्यासाठी पलंग आणि मच्छरदाणी अशी चित्र काढा. किंवा सरळ त्या कामांची यादी करा.नीट आठवून कामं लिहा. कारण घरात खूप लहान लहान कामं सतत चालू असतात. म्हणजे आपण स्वयंपाक हे एकच काम धरतो. पण त्यात पोळ्या / भाकरी, भाजी, आमटी, भात, चटण्या, कोशिंबीर असे बरेच पदार्थ असतात. ते पण एका वेळच्या जेवणात. रात्रीच्या जेवणाला पुन्हा तेच सगळं. शिवाय एकाला बटाटा आवडतो, दुस?्याला पालक आवडत नाही असं असतंच. शिवाय मधल्या वेळचे खाण्याचे पदार्थ, नाश्ता, काहीतरी गोड पदार्थ हे सगळं स्वयंपाक याच सदरात मोडतं. त्याशिवाय घरात कुठली कामं असतात त्याची यादी करा. त्यात किमान 5क् कामं तुम्हाला सापडली पाहिजेत.ही यादी झाली, की तुमचं खरं काम सुरु होईल. आता या यादीतल्या कामांना वेगवेगळे रंग द्यायचे आहेत. जी कामं जनरली आई / आजी / वहिनी / आत्या / ताई करते त्याला पिवळा रंग, जी कामं जनरली वडील / आजोबा / काका / दादा करतात त्यांना निळा रंग आणि जी कामं जनरली रोज तुम्ही करता त्याला हिरवा रंग.
आता ती रंगीत यादी समोर ठेवा आणि प्रामाणिकपणो सांगा की तुम्हालाच घरातली सगळी कामं सांगतात हे बरोबर आहे का? आणि हिरवा रंग थोडा तरी वाढवून, एखाद दोन कामांची रोजची जबाबदारी घेऊन आपण आई किंवा वडिलांचं काम थोडं सोपं करू शकतो का?