पाहिलंत ना,माझ्या कडे किती खजाना आहे, घरातल्या घरात व्यायाम करायचा. व्यायाम करायचा, तर त्यासाठी जिममध्येच जायला पाहिजे, पैसे खर्च करायला पाहिजेत, ग्राऊंडवर जायला पाहिजे असं काही नाही. घरातल्या घरातही आपण खूप चांगला व्यायाम करू शकतो. शिवाय त्यासाठी पैसे मोजायला नको, की अमूकच वेळी बाहेर पडायला पाहिजे, असंही काही नाही. आपल्या वेळेच्या अॅडजस्टमेंटप्रमाणो आपण आपल्या सोयीचा आणि वेगवेगळा व्यायाम करू शकतो. एक मात्र खरं, घरीच आहोत, आता खूप वेळ आहे आपल्याला, असं म्हणून उगाच अळम्टळम करायची नाही. नाहीतर तुमचा व्यायाम बोंबललाच म्हणून समजा.शक्यतो, दिवसाची कोणतीही एक वेळ ठरवून घ्यायची. त्याच वेळी व्यायाम केला तर चांगला, कारण सवयीनं ती वेळ आपल्या लक्षातही राहते आणि आपण आपोआपच व्यायामाकडे वळतो.आतार्पयत तुम्ही ब:याच वेळा हात फिरवले असतील, आजही आपल्याला हातच फिरवायचे आहेत, पण जरा वेगळ्या पद्धतीनं. हातांना झोका द्यायचा. वेगळ्या स्टाइलनं. साधासुधा व्यायाम वाटेल हा तुम्हाला, पण फार उपयोगी आणि महत्त्वाचा आहे. इंग्रजीत या व्यायामाला म्हणतात, ‘आर्म सर्कल्स’ किंवा ‘स्विंग’.कसा कराल हा व्यायाम?
1- दोन्ही पायात थोडं अंतर ठेऊन ताठ उभे राहा.2- आता दोन्ही हात खांद्यातून उचलून जमिनीच्या समांतर ठेवा.3- मनाशीच एक गोलाकार ठरवा आणि त्या गोलातून आपले दोन्ही हात एकाच वेळी फिरवा. एकदा सरळ दिशेनं आणि नंतर उलट दिशेनं.4- थोडी सवय झाली की हात फिरवण्याचा गोलाकार तुम्ही वाढवू पण शकता. 5- सुरुवातीला दोन्ही हात सरळ आणि उलटय़ा बाजूनं दहा-दहा वेळेस फिरवा. 6- वॉर्म अप म्हणूनही हा व्यायाम अतिशय चांगला आहे. नंतर तुम्ही तो थोडा थोडा वाढवूही शकता.काय फायदा होईल?1- तुमच्या मसल्सचा टोन चांगला होईल.2- रक्त शरीरात खेळतं राहण्यासाठी मदत होईल.3- तुमचे शोल्डर्स, बायसेप्स आणि ट्रायसेप्स (दंड आणि त्याच्या मागचा भाग) यांना चांगला आकार येईल. बघा फिरवून हात. पण उगाच अंगात आल्यासारखं करू नका. एका लयीत हात फिरवा. घरात चुकून कुणाला हात लागला, तर कदाचित रडायची पाळी तुमच्यावर येईल.- तुमचीच ‘झोकेखाऊ’ मैत्रीण, ऊर्जा