ठळक मुद्दे तवंगाचा आकार
साहित्यपरात, पाणी, कोळशाची भुकटी, तेल, काच, स्केचपेन, आलेखाचा कागद.कृती1. एका परातीत पाणी घ्या. ते संथ होऊ द्या. 2. त्याच्या पृष्ठभागावर हलके हलके कोळशाची बारीक भुकटी पसरा. 3. त्यावर एक थेंब तेल टाका. तेलाच्या तवंगामुळे कोळशाची भुकटी कडेला ढकलली गेलेली दिसेल. 4. परातीवर एक काच ठेवा. काच न मिळाल्यास जाड प्लॅस्टिकचे पॅड घ्या. 5. स्केच पेनच्या सहाय्याने कागदावर तवंगाचा आकार चितारा.
6. कागद परातीवरून काढून आलेखाच्या कागदावर ठेवा. त्यावरून तवंगाचा आकार मोजा. 7. वेगवेगळी तेले वापरून तवंगाच्या आकारात काही फरक पडतो का? करून पहा.असं का होतं?तेलाच्या रेणूंची आणि पाण्याच्या रेणूंची ओढ जितकी जास्त तितका तवंगाचा आकार कमी.