त्याला जन्मत: ब्रिटल बोन्स नावाचा आजार आहे. ब्रिटल बोन्स म्हणजे असा आजार ज्यात शरीरातली 13क् हुन अधिक हाडं मोडलेली असतात. त्याच्या शरीरातली एवढी सगळी हाडं जन्मत: मोडलेली होती. पण तरीही त्याने हार मानली नाही. अंग खूप दुखायचं, खूप त्रस व्हायचा पण तो जिद्द हरला नाही. त्याचं नाव स्पर्श शहा. स्पर्श न्यू जर्सी, अमेरिकेत राहतो. आज तो चौदा वर्षांचा आहे. तो म्युङिाशन आहे. कविता करतो. जन्मत: शरीरात 4क् फ्रॅर असताना निव्वळ दीड वर्षात त्याने 45 कार्यक्रम केलेले आहेत. यंग व्हॉइस ऑफ न्यू यॉर्क या स्पर्धेतही त्याने पारितोषिक मिळवले आहे. स्पर्श म्हणतो मी स्वत:ला अपंग मानतच नाही, उलट सगळ्या दिव्यांग लोकांचं धैर्य बनेन मी.इतक्या प्रचंड वेदनादायी आजारातून जात असतानाही त्याचा आत्मविश्वास शाबूत आहे. उलट त्याच्या संगीतातून, भाषणातून तो लहानांच्या बरोबर मोठया माणसांनाही प्रेरणा देतो. त्याची भाषणं तुम्ही नक्की बघा. युट्युबवर त्याची पुष्कळ भाषणं आहेत.
स्पर्शला कसं भेटता येऊ शकेल?1. युट्युबवर जाऊन स्पर्श शहा असं जर तुम्ही सर्च केलं तर त्याचे सगळे व्हिडीओज तुम्हाला बघायला मिळतील. 2. कुणाला कशातून प्रेरणा मिळेल सांगता येत नाही, स्पर्शला त्याच्या आजाराने दिली आहे. तुम्हीही रडगाणं न गाता आहे त्यात आनंद मिळवा आणि मोठ्ठी स्वप्न बघा.