सगळे सतत मोबाईल ऍडिक्शन म्हणून काहीतरी बोलत असतात. मोबाईल ऍडिक्शन म्हणजे काय? मी खूप मोबाईल वापरते मग मी ऍडिक्ट आहे का?शीतल ब्रह्मनाळे, सोलापूर
- शीतल खूप महत्वाचा आणि अत्यावश्यक असा प्रश्न तू विचारला आहेस, त्याबद्दल आधी ऊर्जाच्या वतीने थँक यु. कुठलीही गोष्ट जरुरीपेक्षा जास्त करणं, ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटणं, तो गोष्ट केली नाही तर अस्वस्थ वाटणं, ती गोष्ट करायला मिळाली नाही की चिडचिड होणं, त्या गोष्टीशिवाय मनात दुसरा कुठलाच विचार न येणं म्हणजे व्यसन. किंवा ?डिक्शन. मोबाईल ?डिक्शन म्हणजे सतत मोबाईल बघावासा वाटणं, त्याशिवाय डोक्यात दुसरा विचारच न येणं, कुणी मोबाईल बघू दिला नाही तर प्रचंड चिडचिड होणं, राग येणं म्हणजे मोबाईल ?डिक्शन. मुलांमध्ये ही समस्या बघायला मिळते आहे. पण मोबाईल वापरणारी सगळीच मुलं ऍडिक्ट असतात असं मुळीचच नाहीये. शिवाय, मुलांसाठी मोबाईल ?डिक्शनपेक्षा मोबाईल डिपेन्डन्सी हा शब्द अधिक योग्य आहे. म्हणजे काहीवेळा मुलं सगळ्या गोष्टींसाठी मोबाईलवर अवलंबून राहायला लागतात. उदा. अगदी शाळेतला निबंध लिहायचा झाला तरीही गुगलवर निबंध शोधून मग त्यातून लिहावंसं जर एखाद्या मुलाला वाटत असेल तर तो मोबाईल डिपेन्डन्ट आहे, म्हणजे मोबाईलवर अवलंबून आहे असं म्हणता येईल. किंवा एखादा मुलगा दिवसातले चार/ पाच तास मोबाईल गेमिंग करत असेल तर तो मोबाईल डिपेन्डन्ट आहे. सध्या लॉक डाऊनमुळे आपण सगळेच घरात अडकलेलो आहोत. त्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठयांचा ही स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे. आईबाबाही सतत मोबाईलमध्ये डोकं अडकवून बसलेले असतात ना?म्हणजे मोबाईल डिपेन्डन्ट फक्त मुलं आहेत असं नाही तर आईबाबाही आहेत. आता तुला प्रश्न पडला असेल कि यावर उपाय काय?तर नो स्क्रीन डे आणि नो स्क्रीन झोन्स.
एखाद दिवशी ठरवून सगळ्या घराने मोबाईल, टीव्ही किंवा इतर कुठलाही स्क्रीन वापरायचा नाही. त्याला म्हणतात नो स्क्रीन डे. आणि घरातल्या काही जागा या नो स्क्रीन झोन ठरावायच्या, म्हणजे या भागात मोबाईल न्यायाचाच नाही. उदा. जेवणाची जागा, झोपायची जागा या ठिकाणी मोबाईल बंदी करायची. म्हणजे आपोआप तेवढा वेळ स्क्रीन लांब राहतो. आहेत कि नाही सोपी युक्ती!आणि तू मोबाईल ऍडिक्ट नाहीयेस हे लक्षात ठेव. सतत मोबाईल वापरत असशील तर तो मात्र कमी कर.