साहित्य : रंगीत कागद, कागद रोल करायला एक लाकडी किंवा प्लस्टिकची जाड काडी, डिंक, टूथपिक, कात्री, बटाटा, दोरा.
कृती :
1) तुमच्या जवळ असलेल्या रंगीत कागदांच्या 1 इंच रुंदीच्या पट्टय़ा कापून घ्या.
2) लाकडी किंवा प्लॅस्टिकच्या काडीला कापलेल्या कागदाचे एक टोक ठेवा.
3) कागद काडीभोवती जरासा गुंडाळा. आता त्याला डिंक लावा. म्हणजे कागद सुटणार नाही.
4) डिंक वाळला की उरलेला कागद गोल गोल घट्ट गुंडाळत न्या.
5) संपूर्ण कागद गुंडाळून झाला की शेवटच्या टोकालाही डिंक लावा आणि रोल तयार करा.
6) आता एक बटाटा घ्या. त्यावर एक टूथपिक टोचा आणि या टूथपिकला गुंडाळलेला रोल वाळण्यासाठी लटकवून ठेवा.
7) रोल्स वळले की एक दोरा घ्या, तुमच्या गळ्याच्या मापाचा अंदाज घेऊन कापून घ्या. त्यात एक रोल ओवा. त्यानंतर दुसरा ओवा. असं करत सगळे रोल्स ओवून टाका. आणि दो:याची दोन्ही टोकं बांधून मस्त नेकलेस तयार करा.
8) रोल्स ओवताना रंगसंगतीचा नक्की विचार करा. तुमच्या कपडय़ांना मॅचिंग असे कितीतरी नेकलेस तुम्हाला बनवता येतील. किंवा इतरांसाठी बनवून गिफ्ट करता येतील.