ओपन रिसोर्सेस हा शब्द आपल्याला नवा आहे. म्हणजे काय तर ज्ञान कडीकुलपात ठेवायचा एक काळ होताच, पण कुणी काही खास केलं तरी ते इतरांना न वाटण्याची प्रवृत्ती अजून आहेच. त्यालाही आलं, यालाही आलं तर काय आपलं महत्व असं अजूनही अनेकांना वाटतं. म्हणून मुलंही आपलं उत्तर वहीत लिहिलं की ती वही छातीशी घट्ट धरतात, कुणी पाहू नये म्हणून.ते आता विसरायला हवं. ओपन रिसोर्स अॅक्सेस असलेले अनेक हाय क्वालिटी व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ते क्रेडीट देऊन ( हे माझंच असं न म्हणता) आपण वापरले तर चालतात. तसंच आपण जे करतो त्याचा अॅक्सेसही इतरांना देता यायला हवा. त्यासाठी ऑनलाइन शिकवताना लक्षात ठेवाव्यात अशा या अजून काही गोष्टी.
1. ओपन रिसोर्स अॅक्सेसशक्यतो इंटरनेटवरुन जे घ्याल, ते ओपन अॅक्सेसवालं घ्या. ते मुलांना उघडता, वाचता आलं पाहिजे. ते आलं नाही तर लगेच मुलं दणादण मेसेज करतात की ओपन होत नाही, त्यात वेळ जातो. समजावून सांगा, परत पाठवा. डोक्याला ताप होतो. त्यापेक्षा सुरुवातीलाच काळजी घ्या, आणि जे व्हिडीओ, माहिती शेअर कराल ती ओपन रिसोर्स अॅक्सेसवाली आहे ना, हे तपासून घ्या.2. अमूक ते अमूक मिनिटं.जेव्हा मुलांना काही व्हिडीओ पाठवाल, अमूक संदर्भ त्यातून पहा असं सुचवाल तेव्हा नेमका भाग सांगा. म्हणजे 5 मिनिटं 3 सेकंद ते 9 मिनिटं 1क् सेकंद अशी नेमकी वेळ सांगा, आणि तेवढंच पहा असं सांगा. म्हणजे मुलांचा वेळ, गोंधळ वाचेल. नाहीतर 15 मिनिटं व्हिडी्रओ पाहिला आणि काहीच कळलं नाही सर, अशा प्रतिक्रिया ऐकाव्या लागतील.3. ऑनलाइन अॅक्टिव्हिटीटिकमार्क करा अशा अॅक्टिव्हिटींचे बरेच फॉरमॅट इंटरनेटवर मिळतात. ते शोधा, त्यापैकी काही मुलांना करायला द्या. त्यांनाही मजा येईल, आणि तुम्हालाही नवा फॉरमॅट वापरुन प्रश्नपत्रिका, मुलांना विषय समजतोय की नाही याची खात्री करण्यासाठीचे टेस्ट असं सगळं करुन पहाता येईल.
4. थोडय़ात थोडं .नेमकंमुलांना आपण शिकवतोय ते कळतंय की नाही हे जाणून घेणं शिक्षकांना आवडतं. पण असं रॅण्डम सांगू नका की, हा तास कसा वाटला, या तासात काय शिकवलं ते लिहून पाठवा. मुळात जास्त लिहा म्हटलं की मुलांना टेन्शन येतं. त्यात टिचरला काय वाटेल अशी भीतीही वाटते. त्यापेक्षा नेमकी सुचना द्या की, 50 ते 200 शब्दांत लिहा. हे सिरीअस काम नाही, माङया माहितीसाठी हवं. तर मुलं तुमच्याशी मोकळेपणानं बोलतील.5. तुमच्या भावना लपवू नका.तुम्हीही पहिल्यांदाच ऑनलाइन शिकवत आहात, काही चुकेल, काही गडबडेल, तर त्या भावना लपवू नका. शिक्षक आपल्याशी मोकळेपणानं वागतात, सगळं सांगतात, हे मुलांना जास्त आवडतं.