युट्युबवर कशाचेही व्हिडीओज करणारे पुष्कळ लोक असतात. उदा. मोबाईलफोन मिक्सर मधून घालून फिरवला तर फुटतो का हे बघणारे व्हिडीओज लोकं तयार करतात. किंवा मग, साबणाच्या पाण्यावरून पाय घसरला तर काय होईल? मॅगीचा केक कसा लागेल? असे कुठल्याही विषयावरचे अतिशय मूर्खांसारखे व्हिडीओज बनवणा?्यांचं प्रमाणही युट्युबवर कमी नाहीये. आता तुम्हीच सांगा, मोबाईल मिक्सर मधून वाटला तर फुटेलच ना, आणि साबणाच्या पाण्यावर पाय घसरेलच ना, शिवाय मॅगीचा केक करून कुणी खातं का?पण तरीही असे व्हिडीओज लोकं बनवतात आणि लाखोने लोकं हे व्हिडीओज बघतातही.
पण याच अशा व्हिडीओजचा चांगला समाचार घेणारंही एक चॅनल आहे बरका. या चॅनलचं नाव स्ले पॉईंट. दोन बेस्ट फ्रेंडस हा चॅनल चालवतात. यांच्या चॅनलवर अशा सगळ्या व्हिडीओजचा चांगलाच समाचार घेतलेला असतो. आणि तो ही विनोदी अंगाने. परदेशातले अनेक युट्युबर्स हल्ली भारतीय विषयांवर व्हिडीओज बनवायला आणि लागले आहेत. त्यात अगणित चुका असतात त्यावरही अतिशय विनोदी पद्धतीने ही दोघं भावंडं बोलतात. टीका करतात. चॅनल हिंदी आहे आणि गमतीशीर आहे. हा चॅनल बघण्यासाठी slayy point असा सर्च युट्युबवर करा.