ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा
साहित्य :थर्माकोलचे कप, वाळू, माती, पाणी, तापमापी.कृती:1. थर्माकोलचे पाच कप घ्या. 2. एका कपात पाणी भरा. दुसऱ्या कपात वाळू भरा. तिसऱ्या कपात माती भरा. 3. चौथ्या कपात आधी पाणी भरून नंतर त्यात वाळू भरा.4. पाचव्या कपात आधी पाणी भरून नंतर त्यात माती भरा.5. या पाचही कपांमधील पदार्थांचे तापमान नोंदवा.
6. आता सर्व कप दक्षिण-उत्तर दिशेत ओळ करून एक तास उन्हात ठेवा. त्यानंतर पाचही कपांमधील पदार्थांचे तापमान नोंदवा. 7. कपांच्या तापमानात पडलेल्या फरकाची नोंद घ्या. 8. फरक कमी म्हणजे आतल्या उष्माधारकता जास्त.9. पाण्याची उष्माधारकता सर्वात जास्त दिसेल.