माझा दादा सध्या रोज सात तास मोबाईल वापरतो. ते योग्य आहे का? - वैष्णवी नलावडे
वैष्णवी, अतिशय महत्वाचा प्रश्न तू विचारला आहेस. सतत मोबाईलचा वापर आणि सात ते 12 तास दिवसभराचा स्क्रीन टाइम ही अनेकांची समस्या आहे फक्त तुङया दादाची नाही. मुळात इतका प्रचंड स्क्रीन टाइम असणं ही कधीही चांगली गोष्ट नाही. आता आपल्याला करायला काहीच नाहीये त्यामुळे मुलं आणि मोठी माणसंही मोठ्या प्रमाणावर मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. पण या कसोटीच्या काळातच आपण अधिक काळजी घ्यायला हवी आणि आपला स्क्रीन टाइम म्हणजेच मोबाईल आणि टीव्हीचा वापर सीमित करायला हवा.
स्क्रीन टाइम कसा कमी करता येईल? 1. तर त्याची एक सोपी युक्ती म्हणजे आपण कितीवेळ फेसबुकवर घालवला हे तपासण्याचा ऑप्शन असतो.2. फेसबुकच्या सेटिंगमध्ये गेलं कि युअर टाइम व फेसबुक असा एक ऑप्शन असतो. तिथे आपण दिवसभरात किती वेळ फेसबुकवर होतो हे बघता येतं आणि आपल्याला वेळेचं रिमाइंडर द्यायला तिथे गजरही लावता येतो. 3. दादाला निदान फेसबुक रिमांडर लावायला सांग. म्हणजे त्याने 1 तासाचा वेळ सेट केला असेल तर 1 तासानंतर फेसबुकच त्याला सांगेल की, झाला एक तास; तुझी फेसबुक वेळ संपली!4. इतरही सोपे पर्याय आहेत ज्याने स्क्रीनटाईम कमी करता येऊ शकतो. जसं की, घरकाम, व्यायाम, वाचन, झोप घेणं आणि स्वयंपाक शिकणं. 5. दादाला स्वयंपाक येत नसेल तर त्याला सांग, ही मस्त संधी आहे सगळं शिकून घेण्याची. - तुही त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी कर. म्हणजे तुमचा वेळही छान जाईल आणि सारखी मोबाईलची आठवणही येणार नाही.