- चेतन एरंडे
यापूर्वी मुलांनी पालकांपुढे त्यांची शिकण्याची प्रक्रिया सादर केलेली असली तरी आमच्या सर्जनशील पालक गटाच्या बाहेरील लोकांना आणि तेही थेट अमेरिकेतील शिक्षणतज्ञांच्या पुढे ही प्रक्रिया सादर करणो मुलांसाठी नक्कीच आव्हानात्मक होते.पण हे अशक्य असे मुलांना वाटले नाही, त्या साठी त्यांनी आठवडाभर एकमेकांशी इंग्रजी भाषेतून संवाद साधणो, कोण कोणती गोष्ट सादर करणार ते ठरवणो आणि जर कुणाकडे मध्येच इंटरनेट किंवा विजेचा अडथळा आला तर बाजू कशी सावरून न्यायची याची सुद्धा तयारी झाली.अर्थातच त्यामुळे हे सादरीकरण अतिशय यशस्वी झाले मुलांनी त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाला अतिशय आत्मविश्वसाने उत्तरे दिली. या सादरीकरणामुळे व त्यातून मिळालेल्या कौतुकामुळे मुलांचा शिकण्याचा उत्साह अजूनच वाढला आहे.
या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या बॅच मध्ये थेट बेल्जीयममधून जुई सहभागी होत असे. पण तिची शाळा सुरु झाल्याने तिला पुढे सहभागी होता आले नाही. मुलांची वेळ पाळण्यासाठी सुरु असलेली धडपड, एकमेकांना मदत करण्याची इच्छा आणि कोणताही विषय शिकताना त्याविषयी सखोल चर्चा करण्याची मुलांची सवय मला भारावून टाकणारी होती’, असं निरीक्षण जुईची आई पल्लवी जोशी यांनी नोंदवलं.या उपक्रमातून प्रेरणा घेऊन निधीने मुलांसाठी ऑनलाईन एकत्र येऊन कोडी सोडवण्याचा पझल प्लेस हा उपक्रम सुरु केला. त्याचा मुलांना केवळ वेळ घालवण्यासाठी नाही तर गणित व विज्ञान हे विषय शिकण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी होऊ लागला हे आम्ही पालकांनी जवळून अनुभवले.निधीची आई योगिनी गांधी यांनी दिलेली ‘या सगळ्यातून मुले काय शिकली यापेक्षा आम्हाला काय काय शिकवून गेली, हे मला जास्त महत्वाचे वाटते’, ही प्रतिक्रिया या संपूर्ण उपक्रमाचे सार आहे!