- रणजितसिंह डिसले , प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा
तुम्हांला माहितीय का, आमच्या परितेवाडीच्या शाळेतील मुलांचे मित्र जगभरात विखुरलेले आहेत. तब्बल 14क् पेक्षा जास्त देशांत या मुलांचे मित्र आहेत. आणि बघायला गेल तर या मुलांनी क्वचितच त्याचं गाव सोडलं आहे, तेही मामाच्या गावाला जायचं असेल तर. आताच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा ते त्यांच्या परदेशी मित्रंशी बोलतात, मस्त गप्पा मारतात. आणि हो त्यांना इंग्रजी बोलता येत नाही बर. हिंदी आणि मराठी समजतं आमच्या शाळेतील मुलांना. आश्चर्य आहे ना!! याचं कारण म्हणजे या मुलांना मोबाईलचा वापर करून नवनवीन बाबी शिकून घेण्याची सवय लागली आहे. भाषेचा अडथळा येत नाही कारण ही मुले ट्रान्सलेटर नावाचं ऐप वापरतात. ज्यामुळे समोरच्याची भाषा जरी वेगळी असली तरी यांना हिंदी मध्ये ऐकू येत. किती भारीय न हे. कधी कधी गंमत म्हणून ही मुल परदेशी भाषेतील एक दोन शब्द शिकून घेतात. त्यांना आपल्या जेवणाचा डब्बा दाखवतात आणि पदाथार्ची नावे सांगतात. त्यांना जे आवडत ते करतात. एकमेकांना भेटकार्ड सुद्धा पाठवतात. या ऑनलाईन शाळेमुळे ते घर आणि घरातील माणसे आता जवळ आली आहेत. एकमेकांच्या मदतीने नवीन काही न काही शिकत राहतात. आपल गाव, आपली शाळा याच्या पलीकडेही जग आहे. ते जग अनुभवायचे असेल तर ऑनलाईन शाळेत जायलाच हव. बघा प्रय} करून एखादा मित्र आहे का तुमच्याशी मैत्री करायला तयार. तुमची अन त्याची गट्टी समजली कि मला नक्की कळवा.