विवेक सावंत, चीफ मेंटॉर, एमकेसीएल
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शाळा सुरु व्हायला अजून वेळ लागणार आहे अशावेळी आपल्या शिक्षण व्यवस्थेकडे नव्याने बघण्याची संधी आपल्याकडे आहे. याची सुरुवात करत असताना ‘खरं शिक्षण म्हणजे काय?’ याचा विचार करणं आवश्यक आहे. इंग्रजीत स्टडी आणि लर्न असे दोन शब्द वापरले जातात. आपल्याकडे शिकवणं म्हणजे व्याख्यान देणं असं समीकरण रूढ झालेलं आहे. पण प्रत्यक्षात मुलांना कुठलीही गोष्ट ‘करून’ शिकायला आवडतं. नुसतं बघून, ऐकून शिकता येत नाही. एक उदाहरण देतो म्हणजे स्टडी आणि लर्न यातला फरक लक्षात येईल. पोहण्याचं पुस्तक वाचून पोहण्याविषयीच्या लेखी परीक्षेत पास होता येतं पण प्रत्यक्ष पोहता येऊ शकतं का? पोहण्याचं कौशल्य आत्मसात करून, विशिष्ठ वेळे तविशिष्ठ अंतर पोहोत कापून परीक्षेत पास होणं याला महत्व आहे. आपल्याला स्टुडंट्स तयार करायचे नाहीयेत तर लर्नर्स तयार करायचे आहेत, जे प्रत्येक विषयातली प्रत्येक गोष्ट स्वत: करून बघतील!
या पाश्र्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणात सध्या केवळ व्हर्चुअल व्याख्यानं देण्याकडे कल आहे. कृतिजन्य अनुभवांची रेलचेल ही शिक्षणाची पूर्वअट आहे, जे ऑनलाईन शिक्षणात शक्य नाही. मुलं जशी चालायला, बोलायला, पोहायला, दुचाकीवर तोल सांभाळायला, योग्य दिशेने व योग्य गतीने पळत जाऊन योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचून चेंडू ङोलायला पाठ्यक्रम, पुस्तकं, व्याख्यानं, शिक्षा आणि परीक्षांशिवाय स्वत:च शिकतात तितक्याच नैसर्गिकपणो ती भाषा, गणित, विज्ञान, समाजविज्ञान, इ. शिकू शकतात. त्यात त्यांना कृती करायला व चुका करायला भरपूर वाव हवा असतो. पहिल्या प्रय}ात मुलं चुकतात, पडतात पण शिकतात. मोठ्यांच्या हमखास यशप्राप्तीच्या अपेक्षेचा मानसिक ताण त्यांनाही नको असतो पण त्याचबरोबर त्यांना शिक्षकांच्या, वर्गमित्रंच्या आणि क्वचित पालकांच्या मानसिक व सामाजिक मदतीची/आधाराची कमीअधिक गरज असते. कोविड-19 प्रादुभार्वापश्चात बदललेल्या परिस्थितीत एकविसाव्या व्या शतकाशी सुसंगत अशी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रिया शाळेतील शिक्षण आणि घर व परिसरातील शिक्षण यांच्या संयोगातून अंमलात आणावी लागेल. त्याबाबत आणखी थोड, उद्याच्या अंकात!
शब्दांकन: मुक्ता चैतन्य