तुम्ही चित्र काढताना वेगवेगळ्या टूल्सचा वापर कधी करून बघितला आहे का? ठसेकाम वेगळं. त्याव्यतिरिक्त. अनेकदा बाजारात महागडी टूल्स मिळतात, पण त्यापेक्षा आपण घरच्याच वस्तू टूल्स म्हणून वापरू शकतो. उदा. ईयर बड, काटा, टूथ ब्रश, हेअर पिन. यांच्यापासून कसं चित्र काढता येईल हे आज बघूया. साहित्य: ईयर बड, काटा, टूथ ब्रश, हेअर पिन, रंग, कागद, पेन्सिल कृती: 1) एका कागदावर नक्षीकाम चित्र पेन्सिलने काढून घ्या. 2) आता या नक्षीत रंग भरण्यासाठी आपण वेगवेगळी घरातली टूल्स वापरूया. 3) ईयर बडला पुढे कापूस असतो त्यामुळे हा बड रंगात बुडवून त्यांचे छोटे छोटे ठसे तुम्ही नक्षीत वापरू शकता. कापसामुळे वेगळंच टेक्शचर मिळू शकतं.
4) टूथ ब्रशला रंग लावून त्याचा वापर स्प्रे सारखा करता येतो. रंग लावलेल्या ब्रशच्या बाजूने अंगठा जोरात फिरवला की स्प्रे केल्यासारखा रंग उडतो. 5) हेअर पिनचं पुढचं टोक छोटे छोटे रंगीबेरंगी बिंदू काढण्यासाठी वापरता येऊ शकतं. 6) आहेत की नाही सोप्या युक्त्या? याखेरीजही तुम्ही घरातल्या इतर वस्तूंचा वापर करू शकता. 7) तुम्हाला नव्या कुठल्या वस्तूंचा भन्नाट वापर करता आला असेल तर त्याविषयी उजार्ला नक्की लिहून पाठवा. तुम्ही वापर केलेलं चित्रही नक्की पाठवा.