तुमचं ढू तुम्ही जरा हलवून पाहिलंय का कधी? म्हणजे शाळा, क्लासेस सुरू होते, तेव्हा तुमचं ढू कधीच जागेवर नव्हतं, हे आम्हाला माहीत आहे; पण आता सक्तीच्या सुटीवर असताना तुमचं ढू तुम्ही हलवून पाहिलंय का कधी? काय म्हणता? - हलवलंय?अरे, काय येडचॅप समजलात की काय मला? काय केलंत तुम्ही आत्ता?तुमचं बुड हलवून फक्त दुस-या जागेवर टेकवलं. याला नाही म्हणत काही ढू हलवणं !हे बघा, आता आपलं ठरलंय ना, रोज व्यायाम करायचा! तर त्यासाठी आपल्याला ढू हलवावं लागणरच.
तुमच्यात खूप ताकद आहे, तुम्ही आईपेक्षाही जास्त वजन उचलू शकता, तिच्यापेक्षा जास्त जोरात पळू शकता, हे माहीत आहे आम्हाला. पण व्यायाम करायला सांगितला, म्हणजे लगेच आपली ताकद नाही दाखवायची ! तुम्ही ते कुस्तीवाले पैलवान पाहिले असतील, दंडाची बेटकुळी टॅँव टॅँव उडवणारे बॉडीबिल्डर तुम्हाला दिसले असतील, किंवा डब्ल्यूडब्ल्यूएफचे ते ‘राक्षस’ तर तुम्ही टीव्हीवर नक्कीच पाहिले असतील. या सगळ्यांमध्येच खूप ताकद असते, ते रोज खूप व्यायाम करतात आणि बकाबका खातातही; पण व्यायामाला सुरुवात करताना तेही आधी हलका व्यायाम करतात. हातपाय हलवतात, थोडीशी रनिंग करतात. बॉडी गरम झाली की मग आपल्या ख:या व्यायामाला सुरुवात करतात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एकदम उठापटक करायची नाही. दमायचं नाही. आधी वॉर्मअप करायचा. म्हणजे हातपाय हलवून आपली बॉडी आधी व्यायामासाठी तयार करायची.
आज मी तुम्हाला असाच भारी वॉर्मअप सांगणार आहे. ‘ढू’चाच! तुम्हाला नक्की आवडेल.आज काय कराल?
1. राहा एका जागी उभे. - बरोब्बर!2. आता आधी आपला उजवा पाय मागे ‘ढू’ला लावा.मग डावा.3. आता जागच्या जागी हळूहळू उडय़ा मारा आणिआपले पाय ‘ढू’ला लावून पळा.4. पण यात एक ट्रिक आहे. जेव्हा तुमचा उजवा पाय ‘ढू’ला लागेल, तेव्हा डावा हात छातीजवळ गेला पाहिजे आणि डाव्या पाय ‘ढू’ला लागेल तेव्हा उजवा हात.5. पळा जागीच. वीसर्पयत मोजा. पुरे पुरे. जास्त नको. आज एवढंच.उद्या मी तुम्हाला दुसरा भारी व्यायाम सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, व्यायामाच्या आधी रोज ‘ढू’ला पाय लावून पळायचं. मगच व्यायामाला सुरुवात करायची. काय?.