मी परवाच बातम्यांमध्ये ऐकलं की आता कोरोनाच्या काळात जे कुणी खोट्या बातम्या पसरवतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. खोटी माहिती कुणी का पसरवत? असं लोक का वागतात? - विदिशा मडकईकर, गोवा
आपला समाज वेगवेगळ्या वृत्तीच्या माणसांनी बनलेला आहे विदिशा. काही लोकांना समाजात सगळं नीट, सुरळीत चालू आहे हे बघवत नाही. त्यांना समाजात सतत भांडणं हवी असतात. मग ही माणसं काहीतरी चुकीची माहिती पसरवतात. आता सोशल मीडिया, व्हॉट्स अपमुळे खोटी माहिती पसरवणही खूप सोपं झालं आहे. समाजात अशांतता निर्माण व्हावी यासाठी खोटी माहिती आणि बातम्या पसरवत असतात. लोक घाबरून असे खोटे मेसेजेस फॉरवर्ड करतात आणि समाजात गोंधळ उडतो. तुमचे आईबाबाही खूपशा गोष्ट ख?्या कि खोट्या हे न तपासता फॉरवर्ड करत असतात. पण हे धोकादायक असू शकतं. त्यामुळे समाजात अशांतता पसरू शकते. आणि तसं होऊ नये यासाठी खोट्या बातम्या, अफवा पसरावणा?्यांना शिक्षा होईल असं मुख्यमंत्रींनीं सांगितलं आहे. आता या सगळ्यात तू किंवा तुम्ही मुलं काय करू शकता?अफवा, खोट्या बातमी पसरवणारे मेसेजेस तुमच्या ग्रुप्सवर कुणी पाठवले तर त्याबद्दल आईबाबांना विचारा. असे मेसेजेस लगेच फॉरवर्ड करू नका. आईबाबांनाही असे मेसेजेस खरे आहेत की खोटे हे तपासायला सांगा. हे कसं तपासायचं?
सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे वृत्तपत्रंच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि न्यूज चॅनल्स संबंधित मेसेजमध्ये म्हटलंय तशी काही बातमी देताय का? गुगल करूनही तुम्हाला मेसेजमधली माहिती खरी आहे कि अफवा हे समजू शकतं. त्यामुळे माहिती खरी कि खोटी हे तपासायला आईबाबांना मदत कर आणि सजग नागरिकी हो. खोटी माहिती, अफवा यांच्यापासून लांब राहा, घरच्यांनाही लांब राहायला मदत कर.