आग्रा : सामाजिक एकोप्याचे उदाहरण देत दोन मित्र येथून पायीच अयोध्येला निघाले आहेत. दोन मित्रांपैकी एक हिंदू आणि दुसरा मुस्लीम आहे.राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत अयोध्येत पोहोचण्याचा त्यांचा विचार असल्याचे दोघांचे म्हणणे आहे.उस्मान अली (३०) आणि प्रिन्स शर्मा यांनी अयोध्येसाठी पायी रवाना होऊन सामाजिक सौहार्दाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. लोक या दोन मित्रांना आशीर्वाद देत आहेत.यावेळी संपूर्ण देश आनंदात असल्याचे उस्मान आणि प्रिन्सचे म्हणणे आहे. या दोघांनीही सांगितले की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे केवळ हिंदूंमध्येच उत्साह नाही, तर मुस्लीमही आनंदी आहेत. उस्मान अली आणि प्रिन्स शर्मा यांनी सांगितले की, ते रामाच्या नावाने ४८० किलोमीटरचा पायी प्रवास करतील आणि त्यानंतर भगवान श्रीरामाचे दर्शन घेतील. दोन्ही मित्रांच्या हातात भगवा ध्वज आणि पाठीवर राम मंदिराचे चित्र आहे.
श्री राम सर्वांचे आहेतजेव्हा लोकांनी विचारले तेव्हा उस्मान अली म्हणाले, भगवान श्री राम सर्वांचे आहेत.मुस्लीम असल्याचा मला अभिमान आहे पण श्रीरामाची पूजा करण्यासाठी हिंदू असणे आवश्यक नाही.माणसाचे मन स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. राम केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत.