उत्तर प्रदेशपोलिसांनी आणखी एका गुंडाला चकमकीत ठार केले आहे. सुलतानपूरमध्ये एसटीएफने मोठा माफिया आणि शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायला चकमकीत ठार केले आहे. गोरखपूर पोलिसांनी विनोद कुमार उपाध्यायवर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायने स्वतःची संघटित टोळी तयार करून गोरखपूर, बस्ती, संत कबीर नगर, लखनौ येथे अनेक हत्याकांड घडवून आणले होते.
राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार
एसटीएफ मुख्यालयाचे डेप्युटी एसपी दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने उपाध्यायचा एन्काउंटर केला. विनोद उपाध्याय याच्यावर गोरखपूर, बस्ती आणि संत कबीर नगरमध्ये ३५ गुन्हे दाखल आहेत, पण त्याला एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.
शुक्रवारी पहाटे एसटीएफच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने गोळीबार सुरू केला. त्याने एसटीएफ टीमवर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर एसटीएफने त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी त्याचा मृत्यू झाला.
STF टीम ७ महिन्यांपासून उपाध्यायचा शोध घेत होती. STF आणि गोरखपूर क्राइम ब्रँचची टीम ७ महिन्यांपासून उपाध्यायचा शोध घेत होती. विनोद उपाध्याय यांचा यूपीच्या टॉप १० माफियांच्या यादीत समावेश होता. विनोद उपाध्याय हा अयोध्या जिल्ह्यातील पूर्वा येथील रहिवासी असून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूपी पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
एका थप्पडमुळे केली हत्या
विनोद उपाध्याय याने एका थप्पडमुळे एका व्यक्तीची हत्या केली होती. यामुळे तो उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्धी झोतात आला होता. या घटनेतून विनोद उपाध्याय याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. २००४ मध्ये गोरखपूर तुरुंगात बंदिस्त गुन्हेगार जीतनारायण मिश्रा याने काही मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर त्याला थप्पड मारली होती. विनोद उपाध्याय हा अयोध्येचा रहिवासी होता.पुढच्या वर्षी जीतनारायण मिश्रा तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा संधी बघून विनोद उपाध्यायने २००५ साली संत कबीर नगर बखीराजवळ त्यांची हत्या केली, त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आले.