Hardoi News: एखाद्या शहरात रिक्षा चालवणाऱ्याची महिन्याची कमाई किती असेल, तर काही हजार किंवा खूप झाले काही लाखांमध्ये. पण, उत्तर प्रदेशातील एका रिक्षा चालकाने दोन महिन्यात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. फक्त फरक एवढा आहे की, त्या रिक्षा चालकालाही त्याच्या कमाईबद्दल काही माहिती नाही.
हरदोईच्या कछौनामध्ये राहणारा अमन कुमार राठौर ई-रिक्षा चालवतो. त्याचा दोन महिन्याचा टर्न 6 कोटी 67 लाख रुपये है. पण, ही कमाई त्याने केली नसून, त्याच्यासोबत मोठा फ्रॉड झाला आहे. झाले असे की, चालक त्याच्या रिक्षाची बॅटरी खराब झाल्यामुळे परेशान झाला होता. बॅटरी बदलण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तो 50 हजारांचे कर्ज घेण्यासाठी बँकेत गेला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला आयटीआर मागितला.
चालक आयटीआर दाखल करण्यासाठी ई-सेवा केंद्रावर गेला. तिथे गेल्यावर त्या चालकाला समजले की, त्याच्या खात्यावर दोन महिन्यात 6 कोटी 67 लाख रुपयांचे टर्न ओव्हर दाखवत आहे. दिल्लीमध्ये राठौर ट्रेडर्स नावाची कंपनी रजिस्टर्ड आहे, जी कॉपर वायर आणि स्क्रॅपचा व्यवसाय करते. या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन अमन कुमारच्या नावाने आहे. त्याचा आधार आणि पॅन कार्ड तिथे लिंक केलेले आहे. ही गोष्ट समजताच अमन कुमारला मोठा धक्का बसला.
नेमकं काय झालंरिक्षा चालवण्यापूर्वी अमन कुमार बेरोजगार होता, त्यावेळी त्याच्या परिसरात राहणाऱ्या संदीप कुमारशी त्याची ओळख झाली. संदीपने त्याला नोकरी देण्याच्या बहाण्याने, त्याचे आधार आणि पॅन कार्ड घेतले. या गोष्टीला एका वर्षाहून अधिक काळ झाला होता. अमन कुमारने आपला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला, तो आधार-पॅन कार्ड दिल्याचे विसरुन गेला होता. पण, आता खात्यातील उलाढाल पाहून त्याला सर्व प्रकार समजला.