राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दुर्घटना, एका मजुराचा मृत्यू, ७ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:39 AM2024-02-25T11:39:59+5:302024-02-25T11:40:17+5:30
Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. ही यात्रा मुरादाबाज जिल्ह्यामध्ये असताना एक दुर्घटना झाली आहे. राहुल गांधींसाठी उभारण्यात आलेल्या एका तात्पुरत्या कॅम्पमध्ये तयार करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या वॉच टॉवरमध्ये करंट आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. ही यात्रा मुरादाबाज जिल्ह्यामध्ये असताना एक दुर्घटना झाली आहे. राहुल गांधींसाठी उभारण्यात आलेल्या एका तात्पुरत्या कॅम्पमध्ये तयार करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या वॉच टॉवरमध्ये करंट आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. वॉच टॉवर उघडण्यात येत असताना ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंचर सर्व जखमी कामगारांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचार सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाला.
मृत कामगाराची ओळख नरेश अशी पटवण्यात आली आहे. तो झारखंडमधील रहिवासी आहे. सर्व जखमी चतरा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राहुल गांधी यांना रात्री वास्तव्य करण्यासाठी हा तात्पुरता कॅम्प बांधण्यात आला होता. ही दुर्घटना कोतवाली कटघर परिसरातील रामपूर रोड झिरो पॉईंटजवळ घडली.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधून पुढे निघाली. त्यामध्ये प्रियंका गांधी वाड्रा ह्याही सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रवक्ते मनीष हिंदवी ययांनी सांगितले की, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मुरादाबाद येथून पुन्हा सुरू झाली आहे. राहुल गांधींसोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी ह्याही उपस्थित होत्या. ही यात्रा मुरादाबादच्या रस्त्यावर आली तेव्हा तिथे विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.