उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एका कुटुंबामध्ये मुलाचा जन्मदिन आणि नव्या वर्षाचा आनंदोत्सव शोकात बदलला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाजारात केक आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचं वृत्त समजताच कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला, आई-वडील मुलाचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्याची तयारी करत असतानाच ही घटना ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात काल संघ्याकाळी अछल्दा पोलीस ठाण्याच्या हद्दीतीतल महेवा रोडजवळ घडला. मृत अजय हा त्याच्या एका नातेवाईकासोबत दुचाकीवरून मुलाच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी जात होता. गावातून बाहेर पडून दुचाकी मुख्य रस्त्यावर आली असतानाच एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकील धडक दिली.
या घडकेमध्ये अजय आणि त्याच्यासोबत बसलेला चंदन हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी अजय याचा मृत घोषित केले. तर चंदनची गंभीर प्रकृती गंभीर असल्याने त्याला सैफई येतील रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या पोलिसांनी अजय याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून पोस्टमार्टेमसाठी पाठणवण्यात आला आहे. तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
दुसरीकडे अपघाताचे वृत्त समजताच कुटुंबातील आनंदाचं वातावरण शोकामध्ये बदललं, तसेच मृताच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला आहे. त्यांनी सांगितलं की, घरात जन्मदिनाची तयारी सुरू होती. केक आणण्यासाठी अजय हा बाजारात गेला होता. मात्र तिथून अपघाताचं वृत्त आलं आहे.