शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

खोदकाम करताना सापडली वडिलोपार्जित तिजोरी, टाळं उघडल्यावर समोर आलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 5:58 PM

Ancient Vault: उत्तर प्रदेशमधील एटा येथे घरासाठी पाया खोदताना सापडलेल्या जुन्या वडिलोपार्जित तिजोरीचं गुपित अखेर उघड झालं आहे. अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओग्राफी करत या जुन्या तिजोरीचं टाळं उघडण्यात आलं.

उत्तर प्रदेशमधील एटा येथे घरासाठी पाया खोदताना सापडलेल्या जुन्या वडिलोपार्जित तिजोरीचं गुपित अखेर उघड झालं आहे. अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओग्राफी करत या जुन्या तिजोरीचं टाळं उघडण्यात आलं. टाळं उघडून तिजोरी उघडतात त्यामधून एक जोडी सोन्याचे टॉप्स, एक चांदीचं मंगळसूत्र आणि काही कागदपत्रं सापडली. तिजोरीमधून सापडलेल्या वस्तू घरमालकाकडे सुपूर्द करण्यात आल्या. तिजोरीचं टाळं उघडतान आजूबाजूला लोकांनी  मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

एटा येथे एका पडझड झालेल्या घराच्या पुनर्बांधणीसाठी खोदकाम करत असताना एक वडिलोपार्जित जुनी तिजोरी सापडली होती. ही तिजोरी सापल्याची बातमी समजताच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तिजोरीमध्ये सोन्याचे दागिने, चांदीची नाणी असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. तिजोरी सापडल्याची बातमी स्थानिक पोलिसांना समजली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जात ती तिजोरी ताब्यात घेतली. त्यानंतर याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.

ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम आणि तहसीलदार यांची एक टीम बनवली. तसेच डीएमना या टीमसमोर तिजोरी खोलण्याचे आदेश दिले. शुक्रवारी दुपारी अधिकारी गावात पोहोचले. तसेच त्यांनी व्हिडीओग्राफी करत ही तिजोरी उघडायला लावली. त्यानंतर तिजोरीमध्ये सापडलेल्या सामानाची यादी करत ते साहित्य घरमालकाकडे सुपूर्द केले.

मिरहचीमधील पुन्हेरा गावात खोदकामामध्ये सापडलेली तिजोरी ज्या कुटुंबाची होती त्यांचे पूर्वज जुन्या काळात जमीनदार होते. त्यांनी मिरहचीमध्ये शाळेसाठी एक मोठा भूखंड दान म्हणून दिला होता. मात्रता त्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली राहिलेली नाही. त्यांचं वडिलोपार्जित घर जीर्ण होऊन कोसळलं. आता प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेल्या घराचं बांधकाम तिथे करण्यासाठी पाया खोदण्याचं काम सुरू होतं. तेव्हाच ही तिजोरी सापडली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश