शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

आणखी एक पेपर फुटला, आता या परीक्षेत झाला गोंधळ, ४ लाखांत व्यवहार, CBIकडून भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 1:45 PM

Uttar Pradesh Paper Leak: एकीकडे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून पेपर लीकविरोधात कठोर भूमिका घेत असताना दुसकीकडे काही विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे सरकारच्या भूमिकेला धक्का बसताना दिसत आहे.

एकीकडे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून पेपर लीकविरोधात कठोर भूमिका घेत असताना दुसकीकडे काही विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे सरकारच्या भूमिकेला धक्का बसताना दिसत आहे. आता रेल्वे डिपार्टमेंटल प्रमोशनचे पेपर फुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. सीबीआयने ही कारवाई रेल्वे बोर्डाच्या व्हिजिलेन्स विभागाने केलेल्या तक्रारीनंतर केली आहे. ६ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनरल डिपार्टमेंट कॉम्पिटेटिव्ह परीक्षेचे पेपर लीक झाल्याचे उघड झाले होते.

लखनौमध्ये सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परीक्षा देणाऱ्या आणि पेपर लीक करणाऱ्या ११ रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या व्हिजिलेन्स तपास रिपोर्टच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  या प्रकरणी सीबीआयने राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील ११ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. ज्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या त्यामध्ये प्रयागराज, नोएडा, अलिगड, मथुरा, चित्रकुट, जयपूर, भरतपूर, करौली, अलवर, सवाई माधोपूर या शहरांचा समावेश आहे. या धाडींदरम्यान, सीबीआयला काही महत्त्वपूर्ण कागदपत्रंही सापडली आहेत. परीक्षेच्या एक दिवस आधी गाझियाबाज मधील रेल्वेस्टेशनजवळ एका खोलीमध्ये प्रश्नांची उत्तरं सांगितली गेली होती. तसेच परीक्षार्थिंकडून प्रत्येकी ४ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. 

दरम्यान, सीबीआयने परीक्षा घेणाऱ्या अपटेक लिमिटेड या एजन्सीलाही आरोपी बनवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराज रेल्वे भरती बोर्डाकडून ६ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित डीजीसीई परीक्षेचा पेपर लीक करून ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्यातील उत्तरं पुरवण्यात आली होती. दरम्यान, एफआयआरमध्ये भूप सिंह, वेगराज, महावीर सिंह आणि प्रीतम सिंह, जिंतेंद्र कुमार मीणा, प्रमोद कुमार मीणा, हंसराज मीणा, धर्म देव, प्रशांत कुमार मीणा, मान सिंह आणि मोहित भाटी आदी रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत. 

टॅग्स :examपरीक्षाUttar Pradeshउत्तर प्रदेश