शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

AIMIM चा अखिलेश यादव यांना अल्टीमेटम, 5 जागा द्या नाही तर...; I.N.D.I.A. चं टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:29 PM

अखिलेश यादव आणि राहुल गांधी विरोधी आघाडी I.N.D.I.A. ला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखिलेश यादव आणि राहुल गांधी विरोधी आघाडी I.N.D.I.A. ला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. 

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात लोकसभेच्या 80 जागांचे वाट झाले आहे. यात काँग्रेसला 17 तर समाजवादी पक्षाला 63 जागा मिळाल्या आहेत. मात्र यातच, आता AIMIM ने समाजवादी पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी 5 जागांची मागणी केली आहे. एआयएमआयएमने आझमगड, मुरादाबाद, नगीना, संभल आणि आमला लोकसभा जागांवर दावेदारी केली आहे.

...तर 25 जागांवर उमेदवार उभे करू -एआयएमआयएमचे प्रवक्ते मोहम्मद फरहान यांनी माध्यमांशी बोलताना पाच जागांवर आपली दावेदारी केली आहे. ते म्हणाले, जर सपाने पाच जागा दिल्या नाहीत, तर आम्ही 25 जागांवर आमचे उमेदवार उभे करू. यानंतर होणाऱ्या मतांच्या विभाजनाल सपा जबाबदार असेल. आघाडीत जागा मिळाल्यास दलित नेते पवन आंबेडकर नगीनामधून तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली आझमगडमधून निवडणूक लढवतील. तर मुरादाबाद, संभल आणि आमला जागांसाठी नंतर उमेदवारांची घोषणा केली जाईल.

विधानसभेत दिसली होती ताकद - उत्तर प्रदेशात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत AIMIM ने आपली ताकद दाखवली होती. या निवडणुकीत त्यांना केवळ 0.49 टक्के मते मिळाली असली तरी. यामुळेच बिजनौर, नाकुर, कुर्सी, शाहगंज, सुलतानपूर, औरई, फिरोजाबाद, जौनपूर, मुरादाबाद नगर विधानसभा मतदार संघात सपा उमेदवाराचा पराभव झाल्याचे मानले जाते. महत्वाचे म्हणजे, एआयएमआयएम हळूवारपणे सपाची मुस्लीम व्होट बँक फोडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, AIMIM ने आझमगडमधून रशीद अली यांना उमेदवारी देण्याची रणनीती आखली आहे.

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAkhilesh Yadavअखिलेश यादवlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक