उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुझफ्फरनगरच्या मीरापूर विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'बटेंगे तो कटेंगे' वरून खुले आव्हान दिले.
ओवेसी म्हणाले, 'मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, झाशीमध्ये 10 मुले जाळली, उपचारादरम्यान दोन जुळ्या मुलींचा मृत्यू झाला. याकूब मन्सूरी यांनी त्याना जळण्यापासून वाचवले होते. मी योगींना आव्हान देतो की, याकुब मन्सूरी यांच्यासमोर काय कटोगे-बटोगे म्हणाला? बटेंगे-कटेंगेने काय होईल? बांगलादेशात काय झाले आहे?
AIMIM प्रमुख म्हणाले, "इंदिरा गांधींनाही हेच वाटायचे आणि योगी-मोदींनाही हे वाटते की, सत्ता कायमच आपल्यासोबत राहील. बुढाणा घटनेत कुणी लाल टोपीवाले गेले का? आपली माणसे तुरुंगात गेली की सासरी गेल्यासारखे वाटते. अखिलेश यादव, आपण सिंहासमोर येण्याची चिकीची वेळ निवडली. भाजप माझ्यामुळे नाही, तर यांच्यामुळे आला आहे."
ट्रम्प यांच्या विजयासंदर्भात मोठा दाव - ओवेसी म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांचा जिंकूण दिली. सांगा मी लढणे आवश्यक आहे का. हजारो लोकांनी खासदार आणि आमदार व्हावे, असे आपल्याला वाटत नाही. कुंदरकी येथील भाजपचे उमेदवार काय काय बोलत आहेत. शुक्रवार हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. इस्लाममध्ये सलाम आहे. हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसह आरएसएसच्या भागवतांनाही जाऊन सांगा." महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशातील 9 विधानसभा जागांवर होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी 20 नोव्हेबरला मतदान होणार आहे.