शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 3:17 PM

Ayodhya Ram Mandir: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या विशेष दलाकडे राम मंदिर परिसराती सुरक्षा देण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir: श्रीरामजन्मभूमी अयोध्येतील प्रभू रामाचे भव्य-दिव्य मंदिर वेगाने आकार घेत आहे. लवकरच या मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे. रामजन्मभूमी परिसराच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. रामजन्मभूमी सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

रामजन्मभूमीच्या 108 एकर जागेची सुरक्षा विशेष सुरक्षा दलाच्या (UPSSF) हाती असेल. कॅम्पसच्या या 108 एकर क्षेत्राला रेड झोन म्हणतात. हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. आतापर्यंत येथील सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफच्या हाती होती. त्यात आता विशेष सुरक्षा दलाचे कमांडो सामील झाले आहेत. 

मंदिर आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी CRPF च्या एकूण 6 बटालियन तैनात आहेत, ज्यामध्ये CRPF ची एक महिला बटालियनदेखील असेल. त्यांच्यासोबतच पीएससीचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर रामजन्मभूमी संकुलाच्या आत आणि बाहेर सुरक्षेसाठी यूपी पोलिसांची एक टीम तयार असेल. 

प्रशिक्षण दिले जाणारयूपीएससीच्या दोन बटालियनचे 280 जवान अयोध्येत पोहोचले असून त्यांना सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यानंतर त्यांना रेड झोनच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल. मंदिर परिसरात प्रत्येक ठिकाणी सैनिक पाहणी करत आहेत. सैनिकांना संकुलाच्या रुट मॅपची माहिती दिली जात आहे. त्यांना अयोध्येची भौगोलिक स्थितीही सांगितली जात आहे. याशिवाय जन्मभूमी संकुलात भाविकांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षणही विशेष दलांना दिले जात आहे.

UPSSF ला विशेष पॉवरउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेली यूपीएसएसएफ राज्यातील संवेदनशील इमारती, धार्मिक स्थळे, औद्योगिक युनिट्स आणि मेट्रो स्टेशनवर तैनात केले जाईल. UPSSF ला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. UPSSF वॉरंटशिवाय कोणालाही अटक आणि तपासणी करु शकतात.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश