अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर जसजसे पूर्णत्वाकडे येत आहे, तसे शहराने कात टाकून एक वेगळेच रूप धारण केले आहे. सगळीकडे विकासकामे प्रचंड वेगाने पूर्ण होत असताना विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे स्थानकाची नवीन इमारतही सज्ज आहे.
राम मंदिराजवळ ९६३ कोटी रुपये खर्चून चार महत्त्वाचे रस्ते बांधले जात आहेत. ५०० मीटर जन्मभूमी मार्गाचा खर्च ३९ कोटी, ७५० मीटर भक्ती पथासाठी ६२ कोटी, २ किमी धर्मपथासाठी ६५ कोटी आणि १३ किमी राम मार्गासाठी ७९७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे सर्व मार्ग २३ डिसेंबरपर्यंत बांधले जातील. तसेच महामार्गांवर बायपासच्या दिशेने भव्य दरवाजे बांधले जात आहेत.
विमानतळाची इमारत अपूर्णn ११७५ कोटी रुपये खर्चून बायपासजवळ मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. n इमारतदेखील ६९ टक्के तयार आहे. ऑक्टोबरअखेर ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. डिसेंबरपर्यंत अयोध्या विमानतळावरून उड्डाणे सुरू होऊ शकतात.
१० हजार चौरस मीटरचे विशाल रेल्वे स्थानक२४१ कोटी रुपये खर्चून सुमारे १० हजार चौरस मीटरमध्ये बांधलेली अयोध्या जंक्शनची नवीन इमारत २२४ खोल्या-आरामगृह, १,५०० प्रवाशांच्या क्षमतेच्या ६ लिफ्ट, सरकते जिने, फूड प्लाझा आणि २५ डब्यांच्या ३ प्लॅटफॉर्मसह उद्घाटनासाठी सज्ज आहे. आता केवळ फलाटाच्या बाजूचे काही काम बाकी असून, ते एक ते दोन महिन्यांत पूर्ण होईल.