उत्तर प्रदेशातील आझमगड येथील जिल्हा महिला रुग्णालयात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यालयात एडमिनिस्ट्रेटिव अस्सिटेंट/अकाउंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या 26 वर्षीय पल्लवी सिंहचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पल्लवी ही शहर पोलीस ठाण्यासमोरील कॉलनीत भाड्याच्या घरात राहायची. जौनपूरहून आलेल्या पल्लवीच्या नातेवाईकांनी पल्लवीच्या ओळखीच्या व्यक्तीने तिची विष पाजून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पल्लवी सिंहच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र पल्लवीच्या पोस्टम़ॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचलेले पल्लवी सिंहचे मामा विनोद सिंह यांनी पल्लवीला विष देऊन हत्या केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आरोपी तरुणाला भाड्याच्या घरात कोणी नसल्याची माहिती मिळाली. यानंतर तो तेथे पोहोचला. घटनेनंतर त्याची बाईक आणि तो तेथे सापडला. पल्लवीच्या आई-वडिलांना पल्लवीचं लग्न या तरुणाशी करायचं नव्हतं. पुन्हा पुन्हा नकार द्यायचे.
मुलीचे वडील प्रमोद कुमार सिंह यांनी आझमगडमधील कोतवाली शहरात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांची मुलगी पल्लवी सिंह आठवडाभर भाड्याच्या घरात एकटी होती. 20 फेब्रुवारी 2024 रोजी तिचे लग्न होणार होते. 5 मे 2023 रोजी गाझीपूरच्या तरुणांसोबत वरक्षा कार्यक्रम झाला. पल्लवीच्या वडिलांनी सांगितले की, 24 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12:40 वाजता माझ्या फोनवर गौरव कुमार सिंहचे वडील सूर्यजित सिंह यांनी मुलीच्या मृत्यूची माहिती दिली.
पल्लवीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर, जेव्हा ते तिच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना कळले की गौरव जवळजवळ एक आठवड्यापासून तिच्यासोबत राहत होता. तो बुलेट बाईकवर आला. मुलीच्या मृत्यूच्या वेळीही तो तिथेच होता. मुलीच्या अंगावर जखमा दिसत होत्या. पल्लवीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, गौरव कुमार सिंह, भाऊ चंदन सिंह आणि गौरवची आई रंभा सिंह यांनी मिळून मुलीच्या हत्येचा कट रचला. गुन्हा नोंदवण्यापासून रोखण्यासाठी या लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.