आजपासून सुरू झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी २०१४ मध्ये सत्तेत आले होते. आता २०१४ मध्ये ते निघून जातील. उत्तर प्रदेश हा देशातील सर्वात मोठं राज्य आहे. येथे लोकसभेच्या ८० जागा आहेत. भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल.
गुरुवारी मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीबाबत अखिलेश यादव म्हणाले की, इंडियाच्या, आघाडीची बैठक होत आहे. याआधी पाटणा आणि बंगळुरूमध्ये बैठका झाल्या होत्या. ही आघाडी आकारास येईल, असा संपू्ण देशवासियांना विश्वास आहे. भाजपा सत्तेतून बाहेर जाईल. त्यांच्या सरकारने देशाचा विश्वासघात केला आहे. मोदींना आज रक्षाबंधनादिवशी महिलांची आठवण आली आहे. किंमत २०० रुपयांनी घटवली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाव आणखी कमी झाले असते तर अधिक दिलासा मिळाला असता.
उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी केलेल्या विधानावर पलटवार करताना अखिलेश यादव म्हणाले की, ते उपमुख्यमंत्रिपदासाठी पात्र नव्हते. ज्या पदावर ते बसले आहेत त्याचा सन्मान करावा लागेल. आरोग्य विभागात सुधारणा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते त्यांचा विभाग सोडून प्रत्येक आजारावर लक्ष देत आहेत. त्यांनी आपला विभाग आजारी पाडला आहे. जर कुणी हा विभाग दुरुस्त करू म्हटलं तरी १० वर्षांत करता येणार नाही. आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर लूट, भ्रष्टाचार आणि बेईमानी झालेली आहे. रुग्णालयात कुठल्याही गरिबावर उपचार होत नाही आहेत.