उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांनी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचे उदाहरण देत, भारतीय अल्पसंख्याकांना पूर्वजांवर अभिमान बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश असलेल्या इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांचा डीएनए भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावावरही संस्कृतचा प्रभाव आहे. ते म्हणाले की इंडोनेशियामध्ये प्रभू रामचंद्रांना आपला पूर्वज मानले जाते. गरुड ही त्यांची राष्ट्रीय एअरलाइन्स आहे. त्यांच्या चलनावर गणपती आहेत आणि रामलीला हा त्यांचा राष्ट्रीय उत्सव आहे. भारतात राहून, या भूमिचा उपभोग घेणारा, एक मोठा समूह, जो दुर्दैवाने केवळ मतपेटी बनून राहिला आहे, ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते? असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ते लखनौ येथील ताज होटेलेमध्ये आयोजित एका खासगी वृत्त वाहिणीच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशात सुरू असलेल्या अनेक ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले. त्यांनी भारतातील अल्पसंख्याक, वीज चोरी, वक्फ कायदा, तुष्टीकरणाचे राजकारण आणि २०२५ च्या कुंभमेळ्याची तयारी, यांसारख्या विषयांवर सविस्तर भाष्य केले. दरम्यान, सीएम योगी यांनी भारतातील अल्पसंख्याकांना त्यांच्या पूर्वजांवर अभिमान बाळगण्याचा सल्ला दिला. इंडोनेशियाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, एक मोठा इस्लामिक देश प्रभू रामचंद्रांना आपले पूर्वज मानतो आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. भारतातील अल्पसंख्याकांचा एक मोठा समूह हे सत्य स्वीकारू शकेल का की, त्यांचे पूर्वजही प्रभू रामचंद्रच होते?
वक्फ कायद्यात बदल, ही काळाची गरजच -वक्फ कायद्यातील बदलांसंदर्भात विरोधी पक्षाकडून दिल्या जात असलेल्या इशाऱ्यासंदंर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, काळाच्या गरजेनुसार वक्फ कायद्यात बदल होत आहे. संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) या दुरुस्तीवर काम केले, याचा मला आनंद आहे. पुढील सत्रात ते लागू केले जाईल, अशी अपेक्षा आहे. कोणत्याही बदलाचा उद्दिष्ट समाजात पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करणे असतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे देशात CAA लागू करण्यात आला, त्याचप्रमाणे वक्फ विधेयकात सुधारणा केल्यानंतर हे देखील लागू करण्यात येईल, असेही योगी म्हणाले.