शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अखिलेश यादव सीबीआयच्या रडारवर, चौकशीसाठी बोलावले; काय आहे संपूर्ण प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 3:47 PM

Illegal Mining Case : सपा सरकारच्या काळात २०१२ ते २०१६ दरम्यान हमीरपूरमध्ये झालेल्या बेकायदेशीर खाणकामाचे प्रकरण समोर आले होते.

Illegal Mining Case : (Marathi News) लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने अखिलेश यादव यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. अखिलेश यादव यांना २९ फेब्रुवारीला साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण अखिलेश यादव राज्याचे मुख्यमंत्री असतानाच्या बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांना 150 CrPc अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान, अखिलेश यादव २०१२ ते २०१७ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी २०१२ ते २०१३ दरम्यान राज्याचे खाणकाम मंत्रालयही त्यांच्याकडेच होते. त्यावेळी अवैध उत्खननाबाबत गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे सीबीआयने अखिलेश यादव यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, २०१६ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा त्यात माजी मंत्री गायत्री प्रजापती यांचे नाव पुढे आले. इतकेच नाही तर अखिलेश यादव सरकारमध्ये अनेक जिल्ह्यांच्या डीएम राहिलेल्या बी. चंद्रकला यांनाही आरोपी करण्यात आले होते. 

काय आहे प्रकरण?सपा सरकारच्या काळात २०१२ ते २०१६ दरम्यान हमीरपूरमध्ये झालेल्या बेकायदेशीर खाणकामाचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग कायद्यासह इतर अनेक प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी बी. चंद्रकला यांच्यासह सर्व ११ जणांची नावे आहेत. त्यानंतर सीबीआयने बी. चंद्रकला यांच्या घरावरही छापा टाकला. या प्रकरणात बी. चंद्रकला आणि माजी एसपी एमएलसी रमेश चंद्र मिश्रा यांच्यासह ११ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशCBIगुन्हा अन्वेषण विभाग