दोन वर्षांनंतर उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. कसेरू बक्सर येथील एका चाळीस वर्षीय महिलेच्या तपासणी अहवालात याची पुष्टी झाली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास फुफ्फुसात लवकर संसर्ग पोहोचतो आणि त्यामुळे जीव धोक्यात येतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
कसेरू बक्सर येथील 40 वर्षीय महिलेला खूप ताप असल्याने मेरठच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेच्या तपासणी अहवालात स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2020 मध्ये रुग्ण आढळले होते. विभागीय निगराणी अधिकारी डॉ. अशोक तालियान यांनी सांगितले की, आजारी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची स्वाईन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
2020 मध्ये 100 हून अधिक प्रकरणं
2020 मध्ये, मेरठमध्ये स्वाइन फ्लूचे 100 हून अधिक रुग्ण आढळले. तेव्हा स्वाईन फ्लू वगैरे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व व्यवस्था केली होती. स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. हा आजार रोखण्यासाठी औषधे उपलब्ध असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.
स्वाइन फ्लू ठरतो जीवघेणा
H1N1 व्हायरस काहीवेळा फुफ्फुसात पोहोचतो आणि न्यूमोनिया होतो, ज्यामुळे फुफ्फुसं पांढरं होतं. ते धोकादायक आहे. ताप, श्वास घेण्यास त्रास, खूप थंडी वाजणं, खोकला, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणे, अंगदुखी, थकवा, उलट्या आणि जुलाब यांसारखी सामान्य लक्षणं दिसून येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.