शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संतापजनक! 2500 रुपये लाच न दिल्याने रुग्णालयाने केली नाही महिलेची डिलिव्हरी'; बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:10 AM

गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या बदल्यात तिच्या पतीकडे लाच मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोई येथील सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. लाचखोरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आठवडाभरापूर्वी गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या बदल्यात तिच्या पतीकडे लाच मागितल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण हरदोई जिल्ह्यातील सामुदायिक आरोग्य केंद्र बिलग्रामशी संबंधित आहे. रिपोर्टमध्ये लाच न दिल्याने तिला दाखल करण्यास नकार दिल्याचे म्हटलं आहे. 

दुसऱ्या दिवशी पैशांची व्यवस्था करून तरुणाने गरोदर पत्नीला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे खूप समजावून सांगितल्यानंतर पत्नीवर उपचार सुरू करण्यात आले. मजरा सरौना गावातील रहिवासी रीशेन्द्र कुमार याची पत्नी गरोदर होती. रीशेन्द्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, 18 मे रोजी त्याची पत्नी मनिषाला प्रसूती वेदना होत असताना तिला बिलग्राम येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे कर्तव्यावर असलेल्या 3 नर्सनी पत्नीला दाखल करण्यासाठी 2500 लाच मागितली. 

आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच त्याचा तेथून हाकलून देण्यात आला, त्यानंतर तो आपल्या गावी परतला. दुसऱ्या दिवशी लोकांकडून 1500 रुपये मागून त्याने पत्नीसह सामुदायिक आरोग्य केंद्र गाठले. खूप समजावून सांगितल्यानंतर पत्नीला 1500 रुपये घेऊन दाखल करण्यात आले. त्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. नंतर पत्नीने एका मुलाला जन्म दिला, ज्याला वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले तेथे त्याचा मृत्यू झाला.

रीशेन्द्र कुमार याच्या म्हणण्यानुसार, ड्युटीवर असलेल्या नर्स आणि आशा कर्मचार्‍यांनी त्याच्याकडे लाच मागितली होती. पत्नीला योग्य वेळी दाखल केले असते तर मुलाचे प्राण वाचू शकले असते. संतप्त तरुणाने त्याच दिवशी आपल्या मोबाईलवरून व्हिडीओ बनवून नर्सचे हे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याशिवाय या तरुणाने सीएमओ, डीएम, एसपी यांना निवेदन देऊन रुग्णालयातील नर्स आणि आशा वर्कर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सीएमओने तपास पथक स्थापन केले असून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटल