शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हर हर शंभू...गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या यू-ट्युब सिंगरच्या भावाची हत्या, तीन हल्लेखोरांनी घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 4:29 PM

Farmani Naaz's brother killed: उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी प्रसिद्ध यू-ट्युब सिंगर फरमानी नाज हिच्या चुलत भावाची चाकूने भोसकून हत्या केली.

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी प्रसिद्ध यू-ट्युब सिंगर फरमानी नाज हिच्या चुलत भावाची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याबाबतची माहिती मिळताच रतनपुरी ठाणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनी मृताच्या शरीराचा पंचनामा करत ते पोस्टमार्टेमसाठी पाठवले. 

या प्रकरणी पोलिसांकडून कुठलाही अधिकारी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास तयार नाही आहे. ही भयानक घटना रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोहम्मदपूर माफी येथे घडली आहे. येथे शनिवारी संध्याकाळी सुमारे ७.४५ च्या सुमारास खुर्शिद नावाच्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्यारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये खुर्शीद गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी जखमी खुर्शिदला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारांदरम्यान, त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास करून मृत खुर्शिद याचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टेमसाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार मृत खुर्शिद हा तरुण प्रसिद्ध लोकसंगीत गायिका फरमानी  नाज हिचा चुलत भाऊ आहे. या घटनेबाबत माहिती देताना गावचे प्रमुख परवेज सिद्धकी यांनी सांगितले की, संध्याकाळी सुमारे ७.४५ च्या दरम्यान, ही घटना घडली. मृत तरुणाचं नाव खुर्शिद असं असून, तो संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता नमाज पढून आला होता. तसेच जेवण करून रस्त्यावर फिरायला गेला होता. गावापासून सुमारे दिडशे मीटर पुढे तिघे जण दुचाकीवरून आले.  त्यांनी काही विचारणा न करता त्याच्यावर हल्ला केला.  आमच्या गावात यापूर्वी अशी घटना कधी घडली नव्हती. यामध्ये तीन जणांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मृत तरुण हा फरमानी नाज हिच्या काकांचा मुलगा होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश