शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

योगी सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप, डॉ. कफील खानविरोधात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 2:27 PM

डॉ. कफील खान यांनी आपल्या पुस्तकात सरकारविरोधी आणि भडकाऊ गोष्टी लिहिल्याचा आरोपही करण्यात आला. 

उत्तर प्रदेशातील डॉ. कफील खान (Kafeel Khan) पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. लखनौमध्ये कृष्णनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉ. कफील खान आणि त्यांचे सहकारी सरकारविरोधात कट रचत आहेत आणि दंगली पसरवू शकतात, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच, डॉ. कफील खान यांनी आपल्या पुस्तकात सरकारविरोधी आणि भडकाऊ गोष्टी लिहिल्याचा आरोपही करण्यात आला. 

या संपूर्ण प्रकरणाचा सध्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, डॉ. कफील खान यांच्याविरुद्ध कलम १५३-बी, १४३, ४६५, ४६७, ४७१, ५०४, ५०५, २९८, २९५, २९५-ए अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. योगी सरकार पाडण्यासाठी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉ. कफील खान यांच्यावर आहे. गोरखपूर दुर्घटनेवरील 'गुप्त पुस्तक' याच हेतूने गुप्तपणे पसरवले जात आहे, असे दावा तक्रारदार मनीष शुक्ला यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

'चार-पाच लोक डॉ. कफील खान आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या नावाने दंगल घडवण्याबाबत बोलत होते', असा आरोप तक्रारदार मनीष शुक्ला यांनी केला आहे. दरम्यान, मनीष शुक्ला यांच्या तक्रारीच्या आधारे कृष्णानगर पोलिस ठाण्यात डॉ. कफील खान आणि चार-पाच अज्ञात लोकांविरुद्ध १ डिसेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

डॉ. कफील खान यांना आधीही झालीय अटक!ऑगस्ट २०१७ मध्ये गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये डझनभर मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी डॉ. कफील खान हे मेडिकल कॉलेजमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून तैनात होते. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप होता. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. डॉ. कफील खान यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, २०१९ मध्ये डॉ. कफील खान यांना निलंबित करण्यात आले. यानंतर, डिसेंबर २०१९ मध्ये, त्यांना पुन्हा AMU मध्ये CAA विरोधात भडकाऊ भाषण दिल्याबद्दल NSA अंतर्गत अटक करण्यात आली होची. या प्रकरणात डॉ. कफील खान काही महिने तुरुंगात राहावे लागले होते. मात्र, नंतर न्यायालयाने डॉ. कफील खान यांच्यावरील फौजदारी कलमांखालील कारवाई रद्द केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ