सितापूर : देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. देशातील सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून निघतो त्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक मोठा दावा केला आहे. २०२४ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टी ८० पैकी ८० जागा जिंकेल, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच अखिलेश यादव यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, एका प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी अखिलेश यादव सितापूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष सर्व ८० जागा काबीज करेल.
अधिकाऱ्यांवर खोटे बोलल्याचा आरोपउत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की आज राज्यात १०० पैकी फक्त ४ जण बेरोजगार आहेत. राज्यातील नेत्यांबरोबरच अधिकाऱ्यांनी देखील खोटे बोलण्याची मालिका लावली आहे.