राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : काँग्रेस नेते अजय राय यांचे भाऊ अवधेश यांच्या ३० वर्षांपूर्वीच्या हत्येप्रकरणी वाराणसी न्यायालयाने सोमवारी गुंडगिरीनंतर राजकारणी झालेल्या मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
वकिलाने पत्रकारांना सांगितले की, अन्सारीला न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अवनीश गौतम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अन्सारीच्या वकिलांनी ते उच्च न्यायालयात अपील करणार असे सांगितले. काँग्रेस नेते व माजी आमदार अजय राय यांचे बंधू अवधेश यांची ३ ऑगस्ट १९९१ रोजी वाराणसीत निवासस्थानाच्या दारात गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी अन्सारी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे काँग्रेसचे विभागीय प्रमुख अजय राय यांनी सांगितले.