'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 06:15 PM2023-07-26T18:15:03+5:302023-07-26T18:15:36+5:30

मुस्लीम पक्षकारांनी ज्ञानवापीच्या मुद्द्यावर केली होती याचिका

gyanvapi masjid stay on ASI survey as court hearing to be held on appeal of Muslim vs Hindu Petitions | 'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?

'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?

googlenewsNext

Gyanvapi ASI Survey: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी कॅम्पसमधील ASI सर्वेक्षणावरील स्थगिती उद्यापर्यंत वाढवली आहे. उद्या म्हणजेच 27 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. अलाहाबाद हायकोर्टात सुरू असलेल्या ज्ञानवापी प्रकरणात आज दुपारी साडेचार वाजता पुन्हा सुनावणी सुरू झाली होती. एएसआयचे अतिरिक्त उपसंचालक आलोक त्रिपाठी न्यायालयात पोहोचले आहेत. सर्वेक्षणामुळे ज्ञानवापी कॅम्पसचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले. आतापर्यंत सर्वेक्षणाचे ५ टक्के काम झाल्याचे त्यांनी सांगितले. पण एएसआयचे प्रतिज्ञापत्र वाचण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी त्यांना आणखी काही वेळ द्यावा, असे मुस्लिम पक्षाने म्हटले होते. हे पाहता न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, बुधवारी न्यायालयाने साडेचार तास सुनावणी घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने एएसआय सर्वेक्षण पथकाला वाराणसीहून बोलावण्याचे निर्देश दिले होते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बुधवारी दुपारी साडेचार वाजता पुन्हा एएसआय सर्वेक्षण पथकाला तज्ज्ञ म्हणून हजर राहण्यास सांगितले. दुपारी 4.30 वाजता एएसआयचे पथक न्यायालयात हजर झाले. सर्वेक्षणामुळे मशिदीच्या संरचनेचे नुकसान होईल, असा दावा मुस्लिम पक्षाने केला होता.

आजच्या सुनावणीत काय घडले?

अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या २१ जुलै रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली. जिल्हा न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचा २४ जुलैचा आदेश बुधवारी (२६ जुलै) संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच लागू आहे, असे सांगून मस्जिद समितीचे वकील SFA नक्वी यांनी मुख्य न्यायमूर्ती प्रितिनकर दिवाकर यांच्या न्यायालयाला या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने मशीद समितीला उच्च न्यायालयात जाण्यासाठी काही वेळ दिला होता. नक्वी यांच्या विनंतीवर सरन्यायाधीश म्हणाले की, दोन्ही पक्षांना आक्षेप नसेल तर ते स्वत: या प्रकरणाची सुनावणी करू शकतात. त्यावर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी सहमती दर्शवली आणि न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरू केली.

यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार होती, परंतु समितीच्या वकिलांनी तातडीने सुनावणीसाठी मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला, त्यानंतर मुख्य न्यायमूर्तींनीच दुपारी साडेचारच्या सुमारास सुनावणी सुरू केली. दरम्यान, एएसआय या प्रकरणात पक्षकार होऊ नये, असे मुस्लिम पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षांच्या सहमतीने सकाळी साडेनऊपासून पुढील सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: gyanvapi masjid stay on ASI survey as court hearing to be held on appeal of Muslim vs Hindu Petitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.