फर्रुखाबाद - एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भाेगत असताना कैद्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम करावे लागते. त्याचा त्यांना माेबदलाही मिळताे. एक कैदी कायदेशीर सल्ला आणि पत्र लिहिण्यासाठी इतर कैद्यांना केलेल्या मदतीतून लखपती झाला. त्याला १ लाख ४ हजार रुपयांचा माेबदला देण्यात आला.
कुलदीपसिंह असे या कैद्याचे नाव आहे. कुलदीप यांना विधी सेवा प्राधिकरणातर्फे हा माेबदला देण्यात आला आहे. कुलदीप हा पदवीधर आहे. तुरुंग अधीक्षक भीमसेन मुकुंद यांनी त्याला याचिका लिहिण्यासाठी सहायक म्हणून नियुक्त केले हाेते. यामुळे इतर कैदीदेखील चांगले काम करण्यास प्रेरित झाले आहेत.
जन्मठेपेची शिक्षा- कुलदीपसिंह हा एक हत्येच्या प्रकरणात २०१७ पासून जन्मठेपेची शिक्षा भाेगत आहे. - ते कैद्यांना प्राथमिक कायदेशीर सल्ला देणे, याचिकांचा मसुदा तयार करणे किंवा अधिकृत पत्र व्यवहारासाठी मदत करतात. त्यातून मिळालेले पैसे ते घरी पाठवितात.