उत्तर प्रदेश येथील गोरखपूरमधील कुशीनगर महामार्गावरील जगदीशपूरजवळ गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. पाच रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले, तर १० प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. एका बसचा ब्रेक फेल झाल्यानंतर प्रवासी दुसऱ्या बसमध्ये चढत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, ९ जखमी; भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरहून एक कंत्राटी बस कुशीनगरहून पडरौनाकडे जात होती. त्यानंतर जगदीशपूरमधील मालपूरजवळ बसचा टायर पंक्चर झाला. चालक आणि वाहक बस बाजूला उभी करून प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट करत असताना भरधाव वेगात असलेल्या डीसीएमने बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बसमध्ये दोन भाऊ-बहीणही प्रवास करत होते. भाऊ झाशीतून बीटेक करत होता तर बहीण रायबरेलीतून बीटेक करत होती. दोघेही दिवाळीनिमित्त घरी जात होते. या अपघातात भावाचा मृत्यू झाला तर बहीण जखमी झाली आहे. अपघातात बळी गेलेले बहुतेक जण दिवाळीला घरी जात होते, असे सांगण्यात येत आहे.