ननकाना साहिब आपल्यापासून किती काळ दूर राहणार. आपला अधिकार आपल्याला परत मिलायला हवा. एवढेच नाही तर, "हिंदू आणि शीख यांच्यात दरी निर्माण करायचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कारण 'एक हैं तो नेक है'. बांगलादेशात जे काही घडत आहे, ते कुणापासूनही लपलेले नाही आणि यापूर्वी पाकिस्तानात जे काही झाले, तेही कुणापासून लपलेले नाही," असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. गुरू श्री तेग बहादूर जी महाराज यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त लखनऊमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
योगी म्हणाले, "महान शीख गुरूंचा इतिहास आजही सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे. जो आपल्या सर्वांना प्रेरणा देतो काही आव्हाने अजूनही आपल्यासमोर आहेत. अखेर ननकाना साहेब किती काळ आपल्यापासून दूर राहणार? हा अधिकार आपल्याला परत का मिळू नये? हे विचार 1947 मध्ये केला गेला असता, तर कदाचित कीर्तन यात्रेत येणारा अडथळा आपल्याला दिसला नसता. इतिहास आपल्याला परिमार्जनाची संधी देत आहे. मला वाटते त्या परिमार्जनासाठी आपल्या सर्वांना संघटित व्हावे लागेल."
मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, "गुरु श्री तेग बहादुर जी महाराज यांनी देश आणि धर्मापासून बाजूला जात कधीही आणि कुण्याही परदेशी आक्रमकासमोर मस्तक झुकवले नाही. शिख धर्माने देशाला जी एक दीर्घ परंपरा दिली आहे, केच आपल्या सर्वांचे जीवन आहे. हम सबका जीवन है. आपल्याला एक नवी चेतना देते. जर आपण त्याचे अनुसरण केले तर जगातील कोणतीही शक्ती आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही."
मुख्यमंत्री योगी म्हणाले, देशात फूट पडू देऊ नका. असे झाले तर आरपारची लढाई सुरू होईल. जे आज आपल्यासमोर होत आहे. आज बांगलादेशात कट्टरतावाद्यांकडून हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्यक समाजाच्या लोकांच्या हत्या होत आहेत. त्यांची संपत्ती लुटली जात आहे. एवढेच नाही, तर माता-भगिनीही संकटात आहेत."
जोवर जिन्नाचा 'जिन्न' असेल, तोवर... -योगी म्हणाले, जोवर बांगलादेशात जिन्नांचा 'जिन्न' असेल, तोवर अशा प्रकारचे अराजक कायम राहील. तेथे गरीबांचे आणि वंचितांचे शोषण होत आहे. हे पाप 1947 मध्ये देशाच्या फाणीच्या स्वरुपात सर्वांसमोर आले होते. त्याचेच विद्रुप रूप बांगलादेशच्या रूपाने पुन्हा आपल्यासमोर आहे.