शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

बाशिंग बांधलं अन् विपरीत घडलं...; लग्नमंडपातून निघाली नवऱ्याची अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 8:41 AM

नवऱ्याची प्रकृती ढासळल्याने त्याला तातडीने घरच्यांनी मुस्तफाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले.

बहराइच - उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी तयार झालेल्या नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. नवरदेवाची प्रकृती अचानक बिघडल्याने गोंधळ झाला. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबामध्ये शोककळा पसरली. लग्नासाठी टाकलेल्या मंडपात नवरदेवाचा मृतदेह आला. 

लग्नघरात दु:खाचे वातावरण पसरले, वऱ्हाडातून लग्नाला निघालेले लोक नवरदेवाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जरवल रोडच्या अटवा गावातील आहे. याठिकाणी रामलालचा मुलगा राजकमल याचे वऱ्हाड अटैसा गावात जाणार होते. घरी लग्नाचा माहौल होता. लग्नाची सर्वच तयारी पूर्ण झाली होती. नवरदेव राजकमलचे वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होते. राजकमल तयार झाला होता. बाशिंग बांधले होते तितक्याच नवऱ्या मुलाची तब्येत अचानक बिघडली. 

नवऱ्याची प्रकृती ढासळल्याने त्याला तातडीने घरच्यांनी मुस्तफाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की, राजकमलचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. ही दु:खद वार्ता ऐकून कुटुंबाने टाहो फोडला. लग्नघरात शांतता पसरली. सनई वाजायची थांबली. घटनेची माहिती मिळताच नवरीकडील मंडळीही राजकमलच्या घरी पोहचले. काही तासांपूर्वी ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. सगळेच आनंदात होते त्या आनंदावर राजकमलच्या मृत्यूने विरजण पडले. जिथून वऱ्हाड निघणार होते तिथून अंत्ययात्रा निघाली

लग्नासाठी वऱ्हाड निघणार होते, त्यासाठी नातेवाईक, पै-पाहुणे, मित्रमंडळी जमा झाली होती. परंतु त्याच लोकांना नवऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले. शोकाकुळ वातावरणात राजकमलची अंत्ययात्रा निघाली. नवऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकमलच्या मृत्यूने त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला. मुलाच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या आई वडिलांना त्याची अंत्ययात्रा पाहून धाय मोकलून रडायला आले. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका