कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर ग्रामीणमध्ये सायबर गुन्हेगारांनी चक्क एका महिला आयएएस अधिकाऱ्याची फसवणूक केली आहे. IAS महिला अधिकाऱ्याचा फोन हॅक करुन ठगेखोरांना त्यांच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली होती. संबंधित अधिकारी महिलेने याबाबत पोलीस तक्रार केली असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. कानपूर ग्रामीणमधील ही घटना असून येथे जिल्हा परिषदेच्या प्रमुख विकास अधिकारी लक्ष्मी नागपन्न यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
आयएएस अधिकारी लक्ष्मी नागपन्न यांचा मोबाईल ठगेखोरांना हॅक करुन त्याद्वारे नातेवाईकांना मेसेज पाठवले. तसेच, महिला अधिकाऱ्याच्या नातेवाईकांना व मित्रपरिवाकडे पैशांची मागणी केली. याबाबत उलगडा होताच, संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच गोंधळ उडाला. तर, सीडीओ लक्ष्मी नागपन्न यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन, लक्ष्मी यांनी माोबाईल फोनद्वारे पाठवण्यात आलेल्या व्हॉट्सएप मेसेजचा स्क्रीन शॉट्सही पोलिसांकडे दिला. पोलिसांनीही तत्काळ तक्रारीची दखल घेत अधिकारी महिलेचा मोबाईल नंबर सर्विलांस पर टाकून तपास सुरू केला आहे. दरम्यान, हॅकर्सने लक्ष्मी यांचा पर्सनल मोबाईल नंबर मिळवून त्यांच्या नातेवाईकांकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती. घटनेचा तपास सुरू आहे, पण पत्रकारांशी बोलणे आयएएस लक्ष्मी यांनी टाळले.