अयोध्येत राम लाला आपल्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले आणि 22 जानेवारी ही तारीख इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. आता मंगळवापासून सर्वसामान्यांनाही रामललाचे दर्शन घेता येणार आहे. आपणही रामललालाच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन आखण्याच्या विचारात असाल तर, टायमिंगपासून ते छोट्यातील छोट्या गोष्टींपर्यंत जाणून घ्या.
राम मंदिरातील दर्शनाची वेळ आता बदलण्यात आली आहे. मदिरात सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविक दर्शन करू शकतात. दुपारी 1 ते 3 या वेळेत मंदिर बंद रहील. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनुसार, रामलला दर तासाला फळ आणि दूधाचा भोग दाखवला जाईल. प्राणप्रतिष्ठेनंतर आता 23 जानेवारीपासून ब्रह्म मुहूर्तावर साधारणपणे 3 वाजल्यापासून गर्भगृहाची स्वच्छता, पूजन आणि श्रृंगाराची तयारी केली जाईल.
2 तास विश्राम करणार प्रभू श्रीराम -3.30 ते 4 वाजण्याच्या सुमारास, निर्धारित वेळेवर प्रभू श्रीराम यांच्या दोन्ही मूर्ती आणि श्रीयंत्र मंत्रोच्चाराने जागवले जातील. यानंतर, मंगला आरती होईल. यानंतर मूर्तीला अभिषेक, शृंगार केला जाईल. शृंगार आरती होईल. हे सर्व 4.30 ते 5 वाजेपर्यत होईल. यानंतर, सकाळी आठ वाजेपासून भाविकांना दर्शन करता येईल.
दुपारी, साधारणपणे एक वाजता मध्याह्न भोग आरती होईल. दोन तास कपाट बंद राहील, यावेळी श्रीरामलला विश्राम करतील. दुपारी तीन वाजल्यापासून दर्शनाला पुन्हा सुरुवात होईल, हे रात्री 10 बजेपर्यंत सुरू राहील. यातच, सायंकाळी सात वाजता सायंकाळची आरती होईल.