शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 2:14 PM

देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.

देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. बिहारमधील एका शाळेतील व्हिडीओने सर्वांच्या अंगावर काटा आला. विद्यार्थ्यांना भीषण गरमीमुळे भोवळ येऊ लागल्याने शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात देखील भीषण गरमी असून, याचा फटका प्राण्यांना देखील बसत आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे एक माकड बेशुद्ध झाले. मग एका पोलीस कर्मचाऱ्याने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला.

पोलीस हवालदार विकास तोमर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेशुद्ध माकड पाहताच त्यांनी धाव घेत त्याचे प्राण वाचवले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी या पोलीस बांधवाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी विकास यांच्या अप्रतिम कार्याला दाद दिली.

पोलिसाच्या कार्याला सलाम 

उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या झळा कायम आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे उष्माघातामुळे डिहायड्रेशन झाल्याने एक लहान माकड बेशुद्ध झाले होते. मग हवालदार विकास यांनी माकडावर सीपीआर केले. विकास तोमर यांनी माकडाला पाणी पाजले. यावेळी काही लोकांनी त्यांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना २४ मेची असल्याचे कळते. याबाबत पोलीस अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, अति उष्णतेमुळे एक माकड झाडावरून पडले आणि बेशुद्ध झाले. आजूबाजूला बरीच माकडे जमा झाली होती.

 

माकडाच्या पिल्लाला जीवनदान देणाऱ्या विकास तोमर यांनी सांगितले की, आम्हाला अशा कठीण काळात काय करावे याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे. माणसांची आणि माकडांची शरीररचना बऱ्यापैकी सारखी असते. म्हणूनच मी माकडाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या मित्रांनी मला इतर घाबरलेल्या आणि संतापलेल्या माकडांपासून वाचवले. मी माकडाच्या छातीवर सुमारे ४५ मिनिटे पंप केला, अधूनमधून चोळले आणि तोंडात थोडे पाणी टाकले. शेवटी त्याला शुद्ध आली. आता ते माकड रोज या परिसरात येते आणि त्याला इतरत्र फिरताना पाहून मला खूप आनंद वाटतो. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMonkeyमाकडPoliceपोलिस