परिक्षेत अपयश आल्याने टोकाचे पाऊल उचलल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण पास होऊनही १६ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. तिच्या या निर्णयामागील कारणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दहावीच्या परिक्षेत ९५.३ टक्के गुण मिळाल्यानेही तिचे समाधान झाले नाही आणि तिने मृत्यूला कवटाळले. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ही घटना घडली. संबंधित तरूणीला दहावीच्या बोर्ड परिक्षेत ६०० पैकी ५७२ गुण मिळाले होते.
खरे तरे केवळ एक गुण कमी असल्याने ती जिल्ह्यात टॉपर बनू शकली नाही, यामुळे ती नाराज होती. हे स्वप्न अपूर्ण राहिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली अन् एकच खळबळ माजली. मात्र, कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिलेली नाही.
१६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल१६ वर्षीय साक्षी देवी असे मृत तरूणीचे नाव आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, साक्षी फिरोजपूरच्या शाळेत शिकत होती. बोर्ड परीक्षेचा निकाल यावर्षी २० एप्रिल रोजी जाहीर झाला. ज्यामध्ये तिने ६०० पैकी ५७२ गुणांसह ९५.३ टक्के गुण मिळवले. माहितीनुसार, केवळ एक गुण कमी असल्याने ती जिल्ह्यात टॉपर बनली आहे. ती अभ्यासात खूप हुशार होती असे कुटुंबीयांनी सांगितले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेत गौरविण्यात आले. पण टॉप करू न शकल्याने ती गप्प होती. सोमवारी रात्री तिने शेजारील जनावरांच्या शेडशेजारी असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली. सकाळी आई-वडिलांनी लटकलेल्या अवस्थेत तिला पाहताच एकच खळबळ माजली.