हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय राजकीय पक्ष भाजपच्या विरोधात लढण्यासाठी त्याच्या अस्तित्वाच्या संघर्षात सर्वांत वाईट संकटाचा सामना करीत आहे, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मौन समर्थनासाठी बसपाचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. आप हा ‘इंडिया’सोबत २२ जागा लढवीत आहे, तर बसपाने देशात ४२४ उमेदवार उभे केले आहेत. फरक केवळ इतकाच आहे की, आप अनेक आघाड्यांवर भाजपविरुद्ध लढत आहे, तर बसपा हा पक्ष भाजपच्या मदतीसाठी हे सर्व करीत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, बसपाने दोन जागा जिंकल्या तरी ते नशीबवान असतील. २०१९ मध्ये बसपाने उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेससोबत आघाडी करून १० जागा जिंकल्या होत्या. भाजपला मदत करण्यासाठी बसपाने मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार उभे केले आहेत हे लपून राहिलेले नाही. इंडियाला बसपाला सोबत घ्यायचे होते. पण, मायावती यांनी नकार दिला. कारण, त्यांचे भाऊ आनंद कुमार यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल केला होता.
नेमकी अडचण काय? - सूत्रांचे म्हणणे आहे की, अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय सोपा करण्यासाठी बसपाने निवडणुकीच्या मध्यात उमेदवार बदलले.- त्यांच्या १० खासदारांपैकी बहुतेक खासदार वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेल्याने मायावतींचा निवडणुकीत रस कमी झाला असल्याचे दिसते. - आकाश आनंद यांना त्यांचा वारस म्हणून केलेली घोषणा मागे घेण्याचे कारणही उघड आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे मायावतींची अपरिहार्यता यात दिसते.