शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 4:45 PM

कानपूर शहरातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते.

सध्या इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांवर सुद्धा होत आहे. इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम भारतावर सुद्धा होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायावरही या युद्धाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे कानपूर शहरातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. परिस्थिती पाहून शहरातील सर्व चामडे निर्यातदारांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

जागतिक बाजारपेठेवर अचानक बदललेल्या जागतिक परिस्थितीचा परिणाम होईल, असे निर्यातदारांचे मत आहे. असे झाल्यास नुकसानीचा आकडा एक हजार कोटींच्या वर जाऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. उत्तर प्रदेशमधील कानपूर हे चर्मोद्योगासाठी ओळखले जाते. कानपूरमध्ये सेफ्टी बूट आणि शूज, सॅडलरी, पिशव्या आणि इतर चामड्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. येथील वस्तूंची जगभरात निर्यात केली जाते. यामधील सहाशे ते आठशे कोटींचा माल एकट्या इस्रायलला पाठवला जातो. यंदाही आठशे कोटींहून अधिकची मागणी आहे.

सध्याच्या परिस्थितीत तेथील व्यावसायिक माल मागवण्यास टाळाटाळ करत आहेत. निर्यातदारांच्या मते, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध यापुढेही असेच सुरू राहिले, तर शहराच्या व्यवसायासाठी ते चांगले नाही. जागतिक युगात कोणत्याही दोन देशांमधील युद्धाचा केवळ त्या देशांवरच परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम जागतिक पातळीवरही होत असतो, असेही निर्यातदारांचे म्हणणे आहे. 

सध्या या युद्धाच्या जागतिक परिणामाचा फटका कानपूरच्या चर्मोद्योगालाही बसत आहे. कोरोनाच्या काळात जागतिक बाजारपेठ ठप्प झाली होती. आता हळूहळू सर्व काही सामान्य होऊ लागले आहे. आधी युक्रेन-रशिया युद्धामुळे आणि आता इस्रायल-हमास युद्धामुळे जागतिक बाजारपेठ कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या वर्क ऑर्डर्स थांबवण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत, असेही निर्यातदारांनी सांगितले. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धUttar Pradeshउत्तर प्रदेशbusinessव्यवसाय