शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांचा दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:52 IST

या विधेयकात सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहेत.

Yogi Adityanath :लव्ह जिहाद सोडा अन्यथा कठोर परिणामांसाठी तयार रहा...हे शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे होते. सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धर्मांतर बंदी (दुरुस्ती) विधेयक सादर करण्यात आले आणि आज, मंगळवारी हे एकमताने मंजूर झाले.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत योगी सरकारने 'लव्ह जिहाद' हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनवला होता. हे थांबवण्यासाठी 2020 मध्ये राज्यात बेकायदेशीर धर्मांतराचा अध्यादेश मंजूर करण्यात आला, तर 2021 मध्ये विधिमंडळात मंजूर करुन त्याला औपचारिकरित्या कायदेशीर दर्जा देण्यात आला. त्यावेळी या कायद्यानुसार जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होती. आता ननवीन विधेयकात गुन्ह्याची व्याप्ती आणि शिक्षा वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

सुधारित कायद्यात फसवणूक किंवा सक्तीने धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये पूर्वीपेक्षा कठोर कायदा करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त जन्मठेप किंवा 5 लाख रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. सुधारित विधेयकात महिलेची फसवणूक करुन धर्मांतराचे आमिष दाखवणे आणि तिच्याशी बेकायदेशीरपणे लग्न करुन तिचा छळ करणाऱ्या दोषींना जास्तीत जास्त जन्मठेपेची तरतूद आहे. यापूर्वी जास्तीत जास्त 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती.

या गुन्ह्यांना कठोर शिक्षाकोणत्याही व्यक्तीने, एखाद्याचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने धमकावले, मारहाण केली, लग्न करण्याचे आश्वासन दिले किंवा लग्न करण्याचे वचन देऊन कट रचला किंवा एखाद्या महिलेची, अल्पवयीन व्यक्तीची किंवा कोणाचीही तस्करी केली, तर त्याच्यावर सर्वात जास्त गुन्ह्याची नोंद ठेवली जाईल, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सुधारित कायद्यात अशा प्रकरणांमध्ये 20 वर्षे कारावास किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी यात कमाल 10 वर्षे शिक्षा आणि 50 हजार रुपये दंडाची तरतूद होती.

कोणीही एफआयआर दाखल करू शकतोसुधारित तरतुदीनुसार, आता कोणतीही व्यक्ती धर्मांतर प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करू शकेल. यापूर्वी या प्रकरणाची माहिती किंवा तक्रार देण्यासाठी पीडितेचे आई-वडील, भावंड यांची उपस्थिती आवश्यक होती, मात्र आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता ही माहिती कोणीही पोलिसांना लेखी स्वरुपात देऊ शकतो. सुधारित मसुद्यानुसार, अशा प्रकरणांची सुनावणी सत्र न्यायालयात किंवा त्यावरील न्यायालयात होईल आणि सरकारी वकिलांना संधी दिल्याशिवाय जामीन अर्जावर विचार केला जाणार नाही. प्रस्तावित मसुद्यात यातील सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Jihadलव्ह जिहादBJPभाजपा